स्मार्ट मीटर विरोधात शिरवणेकरांचा तीव्र संताप;
स्मार्ट मीटर विरोधात शिरवणेकरांचा तीव्र संताप;
नेरूळ महावितरण कार्यालयात धडक देत लेखी निवेदन
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) : शिरवणे गावातील नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला असून, महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे, मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ठिकाणी अवास्तव वीज बिल येण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे सानपाडा परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या सभांमध्येही नागरिकांनी अशा मीटरच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता शिरवणेमध्येही संतापाचा उद्रेक झाला आहे.
महावितरणने शिरवणे आणि नेरूळ सेक्टर १ परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र काही ठिकाणी जुने मीटर व्यवस्थित असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता नवीन मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून महावितरणचा हेतू संशयास्पद वाटत आहे. या पार्श्वभूमीवर शिरवणे ग्रामविकास युवा मंच, ग्रामविकास मंडळ शिरवणे आणि विविध पक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येत नेरूळ येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. त्यांनी वरिष्ठ अभियंत्यांची भेट घेत स्मार्ट मीटरच्या विरोधात लेखी निवेदन सादर केले. नागरिकांची सरळसरळ फसवणूक असून, महावितरणची ही कृती अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही पूर्वसंमतीशिवाय घाईगडबडीत मीटर बदलण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत, अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.