सानपाडा उड्डाणपुलाखालील खाटांचा पुनर्वापर करा

सानपाडा उड्डाणपुलाखालील खाटांचा पुनर्वापर करा

Published on

सानपाडा उड्डाणपुलाखालील खाटांचा पुनर्वापर करा
सामाजिक कार्यकर्त्याची मागणी
नेरूळ, ता. ६ (बातमीदार) : कोरोना महामारीच्या काळात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कोविड केंद्रातील खाटांचा सध्या पुनर्प्रयोग होण्याऐवजी त्या सानपाडा उड्डाणपुलाखाली निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत. ही खाटांची संसाधने तसेच उड्डाणपुलाखालची मोकळी जागा जनतेच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश सोमाजी कचरे यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी या मागणीसाठी महापालिका आयुक्तांना अधिकृत निवेदन सादर केले आहे.
या खाटा कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी करण्यात आल्या होत्या; मात्र आज त्या देखभाल आणि नियोजनाअभावी निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे त्या निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कचरे यांच्या मते, या खाटांचा पुनर्वापर करून त्यांचा उपयोग नवी मुंबईतील सरकारी रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळांची वसतिगृहे, आरोग्य शिबिरे तसेच लसीकरण केंद्रांसाठी करता येईल. तसेच, या खाटांना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृद्धाश्रम, अपंग पुनर्वसन केंद्र, अनाथाश्रम यांना देणगी स्वरूपातही उपलब्ध करून देता येईल. उड्डाणपुलाखालची जागाही सध्या बकाल होत असून ती जागा ट्रॅफिक पार्क, ओपन जिम, योगा क्लासेस, वाचनालय किंवा पर्यावरणप्रेमी उपक्रमांसाठी वापरता येऊ शकते, असे कचरे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन खाटांचा योग्य वापर आणि जागेचा सार्वजनिक हितासाठी पुनर्विनियोजन करावे, असा आग्रह त्यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com