बेकायदा बांधकामांवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण
बेकायदा बांधकामांवर
अधिकाऱ्यांचे नियंत्रण
एमएमआरडीएतर्फे विशेष नियोजन क्षेत्रात नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) असलेल्या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांना आता चाप बसणार आहे. या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३ अंतर्गत अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
विशेष नियोजन प्राधिकरण कार्यक्षेत्र
- अंबरनाथ, कुलगाव-बदलापूर व परिसर अधिसूचित क्षेत्र
- भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र
- कल्याण ग्रोथ सेंटर
- वांद्रे-कुर्ला संकुल
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र
- ओशिवरा जिल्हा केंद्र
- वडाळा अधिसूचित क्षेत्र
- पालघर येथील विस्तारित एमएमआर क्षेत्र
- अलिबाग येथील विस्तारित एमएमआर क्षेत्र
----
येथे जिल्हाधिकाऱ्यांकडेच अधिकार
पालघर व अलिबाग येथील विस्तारित क्षेत्रांसाठी जोपर्यंत विकास आराखडे अंतिम होत नाहीत, तोपर्यंत विकास परवानग्या त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिल्या जातील. त्यामुळे या भागातील कारवाईची जबाबदारीही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहणार आहे.
----
नियुक्त अधिकाऱ्यांची कामे
- बेकायदा बांधकामे निश्चित करणे
- एमआरटीपी कायद्यातील कलम ५२ ते ५६ नुसार कायदेशीर कारवाई सुरू करणे
- पारदर्शक आणि कायदेशीर कारभारासाठी निश्चित केलेली प्रमाणित कार्यपद्धती अमलात आणणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.