चोरांचा थरार; ग्रामस्थांचा पाठलाग, एक चोर ताब्यात – दोन फरार

चोरांचा थरार; ग्रामस्थांचा पाठलाग, एक चोर ताब्यात – दोन फरार

Published on

शस्त्रधारी चोराला ग्रामस्थांनी पकडले
गुंडगे परिसरात पाठलागाचा थरार, दोघे फरार
कर्जत, ता. ७ (बातमीदार)ः तालुक्यातील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच बुधवारी (ता. ६) रात्री गुंडगे परिसरात तिघेजण चोरीसाठी आल्याची माहिती ग्रामस्थांनी मिळाली होती. त्यापैकी एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले.
गुंडगे डम्पिंग रस्त्याने खोपोलीकडे रिक्षाने चोर पळून जात होते. ग्रामस्थांनी दुचाकीवरून पाठलाग करीत वरणे परिसरापर्यंत त्यांचा पाठलाग केला; मात्र वरणेजवळ रस्ता बंद असल्याने चोरट्यांची रिक्षा पलटी झाली. त्यानंतर तिघे चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तर एका चोरट्याने धारदार शस्त्राने ग्रामस्थांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थांनी दगडफेक करीत प्रतिकार केला.
-------------------------
रात्रभर शोधमोहीम
गुंडगे, नांगुर्ले, तीघर, वरणे येथील ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान राजी फार्महाउसजवळ एक चोरटा लपलेला आढळून आला. स्थानिकांनी तत्काळ कर्जत पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस हवालदार केशव नागरगोजे, पोलिस हवालदार लोहकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले, तर दोघेजण अद्याप फरार आहेत.
-------------------------------
दुसऱ्या रिक्षावरून संभ्रम
चोरांच्या रिक्षामधून चेहरा झाकण्याचे मोठे मास्क, केमिकलयुक्त स्प्रे, पेन ड्राइव्ह, वेगवेगळ्या आकाराच्या कैची आणि चोरीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य सापडले आहे. विशेष म्हणजे, काही ग्रामस्थांच्या मते दोन रिक्षा घटनास्थळी होत्या. दुसरी रिक्षा विरुद्ध दिशेने पळून गेली असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com