रागाच्याभरात चुकीचे पाऊल
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी ८० हून अधिक मुले-मुली अभ्यासावरून रागावल्यामुळे, खेळण्यावरून ओरडल्याने तसेच परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने घर सोडून गेल्याचे आढळले. त्यामुळे रागाच्या भरात उचललेले पाऊल धोकादायक ठरले आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून सात महिन्यांमध्ये ३३३ अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणांची नोंद झाली आहे. यातील २९२ अपह्रत मुला-मुलींचा शोध घेण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले असले तरी ४० मुले-मुली बेपत्ता आहेत. बहुतेक घटनांमध्ये वयात आलेल्या मुलींना फूस लावून, तसेच लग्नाच्या भूलथापा देऊन पळवून नेण्याचे प्रकार नोंदवले गेले आहेत. ८० हून अधिक मुले-मुली अभ्यासावरून आई-वडील रागावल्यामुळे, खेळण्यावरून ओरडल्याने तसेच परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने पळून गेले आहेत.
------------------------------------------
मैत्रीपूर्ण संवाद गरजेचा
किरकोळ कारणावरून रागाच्या भरात घर सोडून गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पालक, शिक्षकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवणे गरजेचे झाले आहे. सोशल मीडियावरील त्यांचे वर्तन लक्षात ठेवा. भावनिक समर्थन आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, तसेच शाळा-कॉलेज स्तरावर समुपदेशनाची सोय करणे अत्यावश्यक आहे.
--------------------------------------
२९२ मुला-मुलींचा शोध
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ जुलै २०२५ या सात महिन्यांच्या कालावधीत ३३३ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्याने त्यांचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यांत आहे. यात २३७ मुली व ९६ मुलांचा समावेश असून अल्पवयीन मुलींची संख्या मोठी आहे. यातील २९२ अपह्रत मुला-मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच स्थानिक पोलिसांना यश आले आहे; पण अजूनही ४० मुले बेपत्ता आहेत.
-------------------------------------
झोपडपट्टी भागांत सर्वाधिक प्रकार
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ज्या भागात झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्ती आहे, अशा भागात अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे प्रकार सर्वात जास्त घडत असल्याचे आढळले. यातील रबाळे, रबाळे एमआयडीसी, तुर्भे, कोपरखैरणे, पनवेल शहर, तळोजा, खारघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वात जास्त मुला-मुलींच्या अपहरणाचे गुन्हे घडल्याची नोंद आहे. इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना कमी घडत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
---------------------------------------
तपास यंत्रणेसमोरील आव्हाने
- अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाच्या अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे केला आहे. परराज्यात जाऊन अपहरण केलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान असते.
- अपहरण झालेल्या मुला-मुलींचे समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने शोध घेण्यात आलेल्या मुला-मुलींचे समुपदेशनदेखील पोलिसांनाच करावे लागते.
----------------------------------------
लहान वयातच कौटुंबिक जबाबदारी
अपहरण झालेली मुले १४ ते १७ वयोगटातील असून बहुतांश मुलींना प्रेमप्रकरणातून तसेच लग्नाच्या भूलथापा देऊन फूस लावून पळवून नेण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. यातील अनेक अल्पवयीन मुलींनी लग्नदेखील केली आहेत. सात महिन्यांमध्ये अशा ९६ मुलांचे अपहरण झाल्याची नोंद आहे. यातील ८६ अपह्रत मुलांचा शोध लावण्यात यश आले आहे.
-----------------------------
अल्पवयीन मुले-मुली वेगवेगळ्या कारणांमुळे घर सोडून निघून जातात. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या बहुतेक घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचे आढळून आले आहे. यासाठी पालकांनी मुलांसोबत संवाद साधणे, त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.
- पृथ्वीराज घोरपडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष
-----------------------------------------
नवी मुंबईमधील अल्पवयीन अपहरणांमध्ये वाढ हा पोलिसांसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय आहे. मुलांच्या मानसिक आरोग्याबरोबर त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक विकासापर्यंत सर्व पातळ्यांवर लक्ष देणे अत्यावश्यक आहे. शासन, शाळा, पालक आणि पोलिसांनी एकत्रितपणे काम केले तरच हे प्रमाण कमी करता येऊ शकते.
- चंद्रकांत मुंडे, समुपदेशक
़ः--------------------------------------------
पोलिस ठाणे दाखल गुन्हे उघड गुन्हे उघड न झालेले दाखल पीडित (मुली/मुले) उघड पीडित (मुली/मुले)
वाशी ९३ ९३ ० ११/२ ११/२
एपीएमसी ९९ ९९ ० ८/४ ७/४
कोपरखैरणे ९२ ९२ ० ५/१ ५/१
खारघर (१) १३० १३० ० २९/२ २८/२
खारघर (२) २० १७ ३ २०/० १५/०
... ... ... ... ... ... ...
उरण ९ ९ ० ४/४ ४/४
उलवे १० ९ १ ६/४ ६/४
एकूण दाखल गुन्हे : १,२२६
एकूण उघड गुन्हे : १,१८८
अजून उघड न झालेले गुन्हे : ३८
दाखल पीडित : ३३३ (मुली : २९१, मुले : ४२)
उघड पीडित : २९१ (मुली : २५१, मुले : ४०)
पीडित बालकांचे वर्गीकरण
कारण संख्या
पालक रागावल्याने ६०
प्रेमप्रकरणे ५१
नातवाइकांकडे गेले ५८
फिरायला गेले ४०
मतिमंद १
मैत्रिणीकडे गेले १
एडीआर २३३
एकूण ४४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.