महावितरणमध्ये कायमस्‍वरूपी कर्मचाऱ्यांची वाणवा

महावितरणमध्ये कायमस्‍वरूपी कर्मचाऱ्यांची वाणवा

Published on

महावितरणमध्ये कायमस्‍वरूपी कर्मचाऱ्यांची वाणवा
केवळ ४० जणांवर ७८ गावांचा भार; अपुऱ्या मनुष्यबळामुळे सेवेवर परिणाम
श्रीवर्धन, ता. ७ (बातमीदार) : श्रीवर्धन तालुक्यातील ७८ महसुली गावे व सुमारे २० वाड्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी महावितरण विभागावर आहे. मात्र, इतक्या मोठ्या क्षेत्रासाठी महावितरणकडे केवळ ४० नियमित कर्मचारी असून सुमारे ६० कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच प्रत्यक्ष सेवा पोहोचवण्याचे मोठे ओझे आहे. कंत्राटी असले तरी हे कामगार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखे सर्व तांत्रिक व धोका असलेली कामे करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
सर्वाधिक जबाबदारी ही कंत्राटी वायरमनवर टाकण्यात आली आहे. नियमांनुसार पोलावर चढणे ही त्यांच्या जबाबदारीत येत नाही, तरीही जीव धोक्यात घालून हे कर्मचारी दिवसरात्र सेवा देत आहेत. अनेक घटनांमध्ये अशा कंत्राटी वायरमनचा अपघाती मृत्यू झाल्याची उदाहरणे असूनही, महावितरण प्रशासन त्यांच्या सुरक्षेबाबत उदासीन आहे. बिल वसुली असो वा दुरुस्ती, वीज गळती थांबवणे असो वा तांत्रिक देखभाल, सगळे आम्हालाच करावे लागते, पण वेतन मात्र कंत्राटीच्या नियामानुसार दिली जाते, अशी खंत एका स्थानिक कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे. याबाबत गोरेगाव येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नवीन विद्युत सहाय्यकांच्या भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. महिनाभरात नव्या कर्मचाऱ्यांची नेमणूक अपेक्षित आहे.
................
वडवली गावातील २५ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर चक्रीवादळात बंद पडला असून, त्याऐवजी मोठ्या क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी ग्रामपंचायतीमार्फत गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ग्रामस्थ निलेश नाकती यांनी सांगितले की, लोड वाढले की वीजपुरवठा खंडित होतो. मोठा ट्रान्सफॉर्मर बसवला तर परिसरातील अनेक घरांना सुरळीत वीज मिळू शकेल. मात्र महावितरणकडून सतत दुर्लक्षच होतंय. महावितरणच्या अपुऱ्या कर्मचारी व्यवस्थापनामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वीजपुरवठा यंत्रणा मोठ्या संकटात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर अखंड सेवा सुरू असली तरी, त्यांच्या सुरक्षेचा आणि न्याय्य हक्कांचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com