रंगीबेरंगी राख्या बाजारात दाखल

रंगीबेरंगी राख्या बाजारात दाखल

Published on

शहापूर, ता. ७ (वार्ताहर) : तालुक्यातील शहापूर, वासिंद, किन्हवली, कसारा, डोळखांब, खर्डी, आटगांव, अघई या बाजारपेठा आकर्षक आणि सजलेल्या राख्यांनी सजल्या आहेत. पारंपरिकसह आधुनिक राख्या महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये सर्वाधिक पसंती तनिष्क व मोरपीस राख्यांना मिळत आहे. शिवाय, गतवर्षीच्या तुलनेत राख्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.
बाजारपेठेत वेगवेगळ्या राख्या दाखल झाल्या आहेत. शहापूर शहराच्या वेगवेगळ्या भागात राख्या विक्रीची दालने उघडण्यात आली आहेत. येथील रंगीबेरंगी राख्या शहापुरातील नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. राख्यांचे आठ हजारांपेक्षा अधिक प्रकार आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अनेक जण टपाल कार्यालयाच्या माध्यमातून, तर काहीजण कुरिअरच्या माध्यमातून भावाला राख्या पाठवत आहेत. त्यामुळे आतापासूनच बाजारपेठेत राख्यांच्या खरेदीची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. महिलांकडून स्टोनच्या राख्यांनाही चांगली मागणी आहे. अलीकडे कपल राखीलाही प्रतिसाद वाढत आहे. पुरुषाबरोबरच महिलेसाठी राखी असते. ती राखी भावाबरोबरच वहिनीलाही बांधली जाते. त्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे.

लहान मुलांसाठी लायटिंग, कार्टूनला पसंती
बाजारात तनिष्क, कुंदन, स्टोन, सिल्व्हर, जरी, दोरी, कपल, मोरपीस असे वेगवेगळे राख्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय, लहान मुलांसाठी लायटिंग आणि कार्टून आणि इतर फॅन्सी राख्या बाजारात आलेल्या आहेत. या राख्यांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात ५० रुपयांपासून ते २०० रुपये किंमतीपर्यंतच्या डझन राख्यांना मागणी अधिक आहे.

बाजारात सध्या २० रुपये डझनपासून ते अडीच हजार रुपये डझनपर्यंत राख्या मिळत आहेत. यंदा गतवर्षीपेक्षा ग्रामीण भागात ग्राहक अधिक आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने त्याचा परिणाम खरेदीवर दिसत आहे. खरेदीसाठी गुरुवार (ता. ७)पासून अधिकचा प्रतिसाद मिळत आहे. परंतु महागाई पाहता यंदा माल कमी भरला आहे.
- शंकर पवार, राखी विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com