........................
जलस्रोतांच्या तपासणीसाठी आता कार्ड पद्धत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राज्यातील आरोग्य संस्थांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले असून, जलस्रोतांच्या पाण्याच्या शुद्धतेसाठी ग्रामपंचायतींना ‘रेड कार्ड-ग्रीन कार्ड’ प्रणाली लागू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.
मुंबईतील आरोग्य भवन येथे गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीत आरोग्य प्रयोगशाळा, १०२ रुग्णवाहिका सेवा आणि परिवहन व्यवस्था यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ही बैठक आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्यातील असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, स्थानिक जलस्रोतांमधील पाण्याच्या गुणवत्तेचा नियमित तपास व्हावा यासाठी आरोग्य संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि संबंधित ग्रामपंचायतींना रेड किंवा ग्रीन कार्ड देऊन योग्य माहिती द्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा ‘एनएबीएल’ प्रमाणित असाव्यात, त्या आधुनिक उपकरणांनी सज्ज असाव्यात, प्रशिक्षित कर्मचारी, स्वच्छता आणि कार्यक्षम सेवा यावर भर असावा, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीला आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त संचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्यासह आरोग्य विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
...
१०२ रुग्णवाहिकांचा वापर...
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या १०२ टोल फ्री रुग्णवाहिका सेवा आता केवळ महिलांसाठीच नव्हे, तर आपत्कालीन वैद्यकीय गरजांसाठी इतर रुग्णांसाठीही वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सेवांचे कॉल सेंटर अधिक प्रभावीपणे मॉनिटर करावे आणि रिक्त पदांच्या भरतीसंदर्भातील प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.