काळाच्या ओघात हरवली स्पंज राखीची आठवण
काळाच्या ओघात हरवली स्पंज राखीची आठवण
बदलत्या काळात रक्षाबंधनाचा आधुनिक अविष्कार
पनवेल, ता. ७ (बातमीदार) ः रक्षाबंधन यंदा शनिवार, ९ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. विविध प्रकारच्या डिझायनर राख्यांनी दुकानांचे आकर्षण वाढवले आहे. मात्र, आजही अनेकांच्या आठवणीत घर करून बसलेली एक खास राखी मात्र आता जवळपास लुप्त झाली आहे, ती म्हणजे मऊशार स्पंज गादीची राखी.
पूर्वीच्या काळातील राखी ही अत्यंत साधी असत. आई-बहिणीच्या हाताने बनवलेली, साध्या दोऱ्याची, कधी एक छोटा डिझाइनचा तुकडा चिकटवलेली राखी हृदयाला भिडणारी होती. त्यानंतर एका टप्प्यावर रंगीत आणि आकर्षक स्पंजच्या गादी राख्यांची चलती सुरू झाली. छोट्या मुलांच्या हातावर ही राखी लावल्यावर जणू उमलणाऱ्या फुलासारखा सौंदर्यपूर्ण अनुभव येत होता.
या राख्यांमध्ये विविध रंग, चमकदार कागदी फुले, प्लॅस्टिक डिझाईन आणि भावाबद्दल विविध संदेश असत. हातात घालून लहान भाऊ ती राखी जिवापाड जपत. पण आता काळ बदलला आहे. डिजिटल युग, आधुनिक शिक्षणपद्धती, बदलते फॅशन ट्रेंड यामुळे स्पंज राखी मागे पडली आहे. आजच्या बाजारात सुपरहिरो डिझाइन्स, लाइट्स असलेल्या राख्या, सोन्या, चांदीच्या, स्फटिक आणि साजेसे स्टायलिश राख्यांचे बोलबाला आहे. छोटा भीम, डोरेमॉन, ॲव्हेंजर्सच्या प्रतिकृतीसह मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी राख्यांचे नवे अवतार उपलब्ध आहेत.
....................
डिजिटल साजरी करण्याकडे झुकाव
नव्या युगात रक्षाबंधन साजरा करण्याच्या पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. दूरदेशी राहणारे भाऊ-बहिण आता व्हिडिओ कॉल, डिजिटल राखी, ऑनलाईन भेटवस्तूंमधून हे नाते जिवंत ठेवत आहेत. पारंपरिक राखीच्या स्पर्शाची जागा आता स्क्रीनवर उमटणाऱ्या हावभावांनी घेतली असली, तरी प्रेम, नात्याचा स्नेह आणि आठवणी आजही तशाच खोलवर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.