सातबारा साक्षरतेसाठी शाळांमध्ये विशेष अभियान राबविले
सातबारा साक्षरतेसाठी शाळांमध्ये विशेष अभियान
महसूल दिन सप्ताहानिमित्त डहाणू तालुक्यात उपक्रम
कासा, ता. ७ (बातमीदार) ः महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून डहाणू तालुक्यात सातबारा साक्षरता अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना महसूल खात्याच्या कामकाजाची माहिती करून देणे आणि जमिनीसंबंधी महत्त्वाच्या कागदपत्रांची ओळख करून देणे असा आहे.
डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार सीमा पुजारी, मंडल अधिकारी, तलाठी आणि इतर महसूल कर्मचारी तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सातबारा उताऱ्याची ओळख करून देत आहेत. गुरुवारी (ता. ७) डहाणूमधील के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये या अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये महसूल विषयक साक्षरता वाढून भविष्यात शेतजमिनीशी संबंधित व्यवहार करताना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकारी वर्गाने व्यक्त केला. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना जमिनीच्या कागदपत्रांबाबत प्राथमिक माहितीही नसते, हे लक्षात घेऊन हे अभियान उपयुक्त ठरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. या उपक्रमामागे केवळ कागदोपत्री माहिती देण्याचा हेतू नसून, मुलांना बालवयातच शासनाच्या विविध यंत्रणांबाबत जागरूक करून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवण्याची दूरदृष्टी आहे. महसूल विभागाचे हे पाऊल स्तुत्य असल्याची भावना पालक व शिक्षकवर्गाने व्यक्त केली आहे.
यावर मार्गदर्शन
सातबारा म्हणजे काय, त्यातील नोंदींचा अर्थ, त्याचे महत्त्व, त्याचा उपयोग अशा बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या जात आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना सातबारा उताऱ्याचे प्रत्यक्ष उदाहरण दाखवून त्यातील प्रत्येक घटकाची माहिती देण्यात आली. या वेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमीन नोंदणी, हक्क व दावे, वारस हक्क नोंद, फेरफार, जमिनीची मालकी यांसारख्या बाबींवर मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.