मुंबईत इन्फ्लूएंझा पसरतोय

मुंबईत इन्फ्लूएंझा पसरतोय

Published on

मुंबईत इन्फ्लूएंझा पसरतोय
सर्वाधिक २११ रुग्णांची नोंद; ठाणे तिसऱ्या क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा इन्फ्लूएंझा विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मुंबईत इन्फ्लूएंझाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत सर्वाधिक २११ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर, तर ठाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अनेकदा हवामान बदलले की हंगामी आजार वाढू लागतात. सामान्यतः इन्फ्लूएंझा विषाणू हिवाळ्यानंतर सक्रिय होतो; परंतु या वेळी तो वर्षाच्या सुरुवातीपासून सक्रिय राहिला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत इन्फ्लूएंझाच्या एकूण १४ लाख ५६ हजार १०० तपासण्या केल्या गेल्या आहेत. स्वाईन फ्ल्यूबाधित ५८१ रुग्णांची नोंद झाली आहे आणि दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. नागपूर आणि नाशिकमधील हे दोन मृत्यू आहेत. गेल्या वर्षी राज्यात एकूण ७२ मृत्यू नोंदले गेले होते. गेल्या वर्षी दोन हजार ३५१ रुग्ण स्वाईन फ्ल्यूबाधित रुग्ण सापडले होते. स्वाइन फ्ल्यू इन्फ्लुएंझा एच१एन१ विषाणूमुळे होतो. हा संसर्ग आजारी व्यक्तीच्या शिंका आणि खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांमुळे पसरतो. साधारणपणे या आजाराचे स्वरूप सौम्य असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी न घाबरता या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी.
...
आरोग्य विभागाच्या उपाययोजना
- फ्ल्यूसदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
- फ्ल्यूसदृश रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार
- राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना
- उपचार सुविधा असणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्ल्यू उपचारांची मान्यता
- आसेलटॅमिवीर आणि साधनसाम्रगीचा पुरेसा साठा
...
अशा प्रकारे स्वतःचे रक्षण करा
- बाहेरून घरी आल्यानंतर साबणाने हात धुवा
- पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या
- आपल्या आहारात लिंबू, आवळा, गोड लिंबू, संत्रे, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी घटकांचा समावेश करा
- दिवसभरात भरपूर पाणी प्या
- शिंकताना किंवा खोकताना तुमचे नाक आणि तोंड रुमालाने किंवा टिश्यूने झाका
- ताप आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
- फ्ल्यूची लस देऊन रोगाचा धोका टाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com