नारली पूनवंचा सण आयलाय..गो..

नारली पूनवंचा सण आयलाय..गो..

Published on

नारली पूनवंचा सण आयलाय..गो..
कोळीवाड्यांमध्ये होड्या, नारळ सजवटीची धुम
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : सन..आयलाय..गो..आयलाय..गो नारली पूनवंचा..मन आनंद माव ना..कोल्यांच्या दुनियेला..या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरायला अवघा रायगडासह ठाणे, मुंबई आणि पालघरमधील कोळीवाडे सजले आहेत. नारळी पौर्णिमेच्या दिवासापासून पारंपारीक मासेमारीला सुरुवात होते. समुद्राला नारळ वाहयल्यानंतर उधाण कमी होते, आणि मासेमारीला गेलेल्या होड्यांचे समुद्रदेवता रक्षण करते अशी कोळी समाजाची समज आहे. त्यामुळे हा सण अगदी अबालवृद्धांपासून सगळे घटक सहभागी होतात. पारंपारीक वेशभूषेत मनसोक्त गाणे गात व नृत्य करीत नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.

महाराष्ट्राला सुमारे ७२० किलो मीटर लांबीचा विस्तिर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. गोव्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे व पालघर पर्यंत समुद्र पसरलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळी समाजाचे वास्तव्य आहे. समुद्रातून मिळणाऱ्या मासळीवर कोळी समाजाचे उदरनिर्वाह चालते. पावसाळ्यात मासेमारीला बंदी असते. नियमाप्रमाणे १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते. परंतू जोपर्यंत नारळी पौर्णिमा होत नाही. तोपर्यंत समुद्राला येणारी उधाणाची भरती आणि वादळे थांबत नाही, अशी कोळी समाजामध्ये समज आहे.

नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केल्यावर त्याला नारळ वाहिल्यानंतर समुद्र शांत होतो. मासेमारी करायला गेलेल्या कोळी बांधवांचे रक्षण करतो. त्यामुळे या सणाला कोळी समाजात अनण्यसाधारण महत्व आहे. म्हणून या दिवशी अलिबागपासून पनवेल, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि मुंबईतील प्रमुख कोळीवाड्यांमध्ये नारळाची प्रतिकृती तयार करुन वाजतगाजत मिरवणूक निघते, बासब्रँडच्या तालावर पारंपारीक कोळी गाण्यावर नृत्य करीत ही मिरवणूक गावभर फिरते.

नारळाची पूजा करुन सोन्याच्या रंगाचे पाणी चढवलेले आणि सजावट केलेले नारळ होडीद्वारे दर्याला वाहिले जाते. नवी मुंबईमध्ये दिवाळे, सारसोळे, वाशी आणि दिवा कोळीवाडा या ठिकाणी नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरे होते. या काळात मिरवणूकीला सहभागी झालेल्या कोळी महिलांचे व पुरुषांचे पेहराव पाहण्याजोगे असतात. त्यामुळे हा सण पाहण्यासाठी कोळीवाड्यांमध्ये इतर नागरिकांची मोठी गर्दी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com