राजकीय शुभेच्छूक
राजकीय शुभेच्छुक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पहिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सकाळच्या ठाणे कार्यालयाला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना शिंदे गटाचे सचिव राम रेपाळे, माजी उपमहापौर रमांकात मढवी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मृणाल पेंडसे, काँग्रेसचे राजेश जाधव, माजी नगरसेवक योगेश जानकर, शिवसेना ठाकरे गटचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी अजित पवार गट मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि त्यांची कन्या वृषाली वाघुले, मनसे नेते अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, काँग्रेसचे ठाणे शहर प्रवक्ते राहुल पिंगळे, काँग्रेसचे सेवादलचे अध्यक्ष रवी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय मान्यवर
जिल्हाधिकारी डॉ. श्रीरामनाथ पांचाळ, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, वाहतूक शाखा उपायुक्त पंकज शिरसाट, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, दंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त शेखर बागडे, नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, एसआरए अधिकारी मिनल पालांडे, ठाणे पालिका उपमाहिती अधिकारी प्राची डिंगणकर, ठाणे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी आदी उपस्थित होते.
कलाकारांची हजेरी
अभिनेते, दिग्दर्शक मंगेश देसाई यांनी सकाळच्या ठाणे कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. धर्मवीर चित्रपटाला राज्य पुरस्कारामध्ये धर्मवीर चित्रपटाने धडाका लावल्यामुळे दैनिक सकाळतर्फे या वेळी मंगेश देसाई यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, कार्यक्रमाला कलाकार संतोष जुवेकर, गौरव कोलूष्टे, संगीतकार चिनार खारकर बॉलीवूड मेकअप डिझायनर रवी समेळ व त्यांच्या पत्नी तथा निर्माती रेवा समेळ आदी उपस्थित होते.
मान्यवर अतिथी
दैनिक सकाळ ठाणे कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी एमसीएचआयचे माजी अध्यक्ष आणि विकसक जितेंद्र मेहता आवर्जुन उपस्थित होते. याशिवाय वृत्तपत्र क्षेत्राशी संबंधित विविध मान्यवरांनीही उपस्थिती लावली. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे, शाईन अॅडव्हरटायझिंगच्या संयुक्ता घोसाळकर, सरीता साळवे, सारथी अॅडव्हरटायजचे अमोल धर्मे, मकरंद मुळे, टीपटॉपचे जयदीप शहा, एसएस अॅडव्डरटायजचे सुधीर साने, ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, विवेक इसामे, वैभव म्हात्रे, नीलेश कदम, जितेंद्र क्षीरसागर, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनाचे अध्यक्ष विष्णू सावंत, सचिव संतोष विचारे, टेंभिनाका विभागप्रमुख समीर कोरे, दीपक सोंडकर, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघर्ष समितीचे संजय सातार्डेकर, अनुपकुमार प्रजापती तसेच श्रमिक संघटनेचे जगदिश खैरालिया उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.