प्रवाशांसाठी रेल्वेची आकर्षक भेट

प्रवाशांसाठी रेल्वेची आकर्षक भेट

Published on

रेल्वेची ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना
परतीच्या तिकिटावर २० टक्के सवलत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : आगामी दिवाळी आणि त्यानंतरच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी होणारी प्रचंड गर्दी व तिकिटांसाठीची धावपळ कमी करण्यासाठी रेल्वेने ‘राउंड ट्रिप पॅकेज’ ही नवी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत प्रवासाचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना परतीच्या प्रवासावर थेट २० टक्के सवलत दिली जाणार आहे.
रेल्वेच्या या योजनेसाठी प्रवाशांना आपली तिकिटे १४ ऑगस्टपासून आरक्षित करता येतील. यामध्ये प्रवास कालावधी १२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आणि परतीचा प्रवास १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान असणे आवश्यक आहे. दोन्ही तिकिटे एकाच प्रवाशाच्या नावाने, त्याच श्रेणीमध्ये आणि त्याच स्थानकांदरम्यानची असणे गरजेचे आहे. या योजनेसाठी प्रथम जाण्याचे तिकीट बुक करून नंतर ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’द्वारे परतीचे तिकीट आरक्षित करावे लागेल. परतीचे तिकीट आरक्षित करताना ‘अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड’ नियम लागू होणार नाही; मात्र एकदा आरक्षित झालेली तिकिटे रद्द किंवा त्यामध्ये बदल करता येणार नाहीत, तसेच अन्य कोणतीही सवलत, पास लागू होणार नाही.

प्रायोगिक तत्त्वावर योजना!
‘राउंड ट्रिप पॅकेज’ ही योजना सर्व श्रेणीतील व बहुतेक गाड्यांना लागू असून, विशेष गाड्यांचाही यात समावेश आहे; मात्र ‘फ्लेक्सी फेअर’ लागू असलेल्या गाड्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल. दोन्ही तिकिटे एकाच माध्यमातून ऑनलाइन किंवा आरक्षण काउंटरवर  आरक्षित करणे बंधनकारक आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही योजना प्रायोगिक स्वरूपात राबवली जात असून, सणासुदीच्या काळात गर्दीचे नियोजन, प्रवास सुलभ करणे आणि दोन्ही दिशेने गाड्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com