पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करावा

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करावा

Published on

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नारा
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः श्रीगणरायाचा उत्सव हा प्रदूषणाचे विघ्न दूर करून पर्यावरणपूरक साजरा करण्याकरिता प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन नवी मुंबई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केला आहे.
कैलास शिंदे यांनी श्रीगणेशमूर्ती चिकणमाती, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), प्लॅस्टिक आणि सिमेंट यांसारख्या साहित्यापासून बनवल्या जातात. या मूर्तींना सजवण्यासाठी बरेचदा विषारी रंगांचा वापर केला जातो. या मूर्तींचे विसर्जन होते त्या वेळी हे रंग व साहित्य पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. परिणामी पर्यावरणाचे प्रदूषण होते. त्याकरिता पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन केले आहे.
सीबीडी बेलापूर येथील कपडा पुनर्वापर प्रकल्पाच्या ठिकाणी वापरलेल्या कपड्यापासून आकर्षक सजावट साहित्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या साहित्याचा वापर करून नागरिक आपली सजावट आगळ्यावेगळ्या पद्धतीने आकर्षक करू शकतात. हे साहित्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावे याकरिता पालिका मुख्यालय आणि आठही विभाग कार्यालयांमध्ये या साहित्याचे विशेष स्टॉल मांडण्यात आले आहेत. उत्सवांमध्ये डीजे, लाऊडस्पीकरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण हा आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असून, निवासी भागात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ५५ डीबी आणि रात्री १० ते मध्यरात्रीपर्यंत ४५ डीबीपेक्षा जास्त आवाज नसावा. तसेच मध्यरात्रीनंतर लाऊडस्पीकरचा वापर करू नये, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

कृत्रिम तलावात विर्सजन करावे
पालिकेने नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण कमी करण्याकरिता विसर्जनासाठी सर्वच विभागात सार्वजनिक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी जलप्रदूषण टाळण्यासाठी श्रीमूर्ती विसर्जनासाठी प्राधान्याने कृत्रिम तलावांचा वापर करावा. ६ फूट उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे.

टाकाऊ वस्तूंचा वापर करावा
महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान ५.० या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान याअंतर्गत प्लॅस्टिक व थर्मोकोलमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिव्हल) सण-उत्सव साजरा करावा. उत्सव कालावधीत नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा, सण समारंभामध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करावा, फटाक्यांचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव २०२५ साजरा करावा, असे आवाहन कैलास शिंदेंनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com