घनकचरा संकलनांची माहिती स्कॅनरवर
घनकचरा संकलनांची माहिती स्कॅनरवर
पनवेल महापालिकेकडून आयसिटी प्रणालीचा वापर
खारघर, ता. १० (बातमीदार) : पनवेल महापालिका हद्दीतील गावे, सिडको वसाहतीमधील घनकचरा संकलन, वर्गीकरण शास्रोक्त पद्धतीने होणार आहे. यासाठी पालिकेकडून आयसिटी प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यासाठी सोसायटींच्या दर्शनी भागात स्कॅनर लावले जात असून, घनकचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर काम करणारे कामगार आणि पर्यवेक्षकांना नोंद करणे बंधनकारक आहे.
राज्य शासनाने कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक शास्रोक्त पद्धतीने व्हावे तसेच घनकचरा संदर्भात नागरिकांचा अभिप्राय किंवा तक्रार नोंदणीसाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित (आयसीटी) प्रणालीचा वापर सुरू केला आहे. राज्य शासनाच्या सूचनांनुसार पनवेल पालिका हद्दीतील गावे आणि शहरातील कचऱ्याचे संकलन होणार आहे, पण अनेकवेळा काही सोसायट्यांमधील कचरा उलचला जात नसल्याच्या तक्रार येतात. त्यानंतर संबंधित विभागातील पर्यवेक्षक त्याची शहानिशा करतो, मात्र आयसिटी प्रणालीच्या नियमानुसार कचरा संकलनासाठी सोसायटीच्या दर्शनी भागात स्कॅनर लावले जाणार आहेत. या प्रणालीमुळे तक्रारींचे प्रमाण कमी होणार आहे.
------------------------------------------
पालिका हद्दीतील वर्गीकरण
प्रतिदिन कचरा - ५०० टन
ओला - २५२ टन
सुका- १८० टन
घरगुती - ४.५ टन
सॅनिटरी - १३.५ टन
संकलनासाठीची वाहने - १०५
घंटागाडीवरील कर्मचारी- ४५०
पर्यवेक्षक - २४
़़़़़़़़़़़़़़ः-------------------------------------
प्रणालीचे फायदे
आयसिटी प्रणालीनुसार कचरा व्यस्थापनाच्या प्रक्रियेत कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. या प्रणालीनुसार सोसायटीच्या दर्शनी भागात लावलेल्या स्कॅनरनुसार कचरा संकलनाची वेळ समजणार आहे. तसेच प्रणालीचे काम योग्य प्रकारे व्हावे यासाठी घंटागाडीवर काम करणारे कामगार आणि पर्यवेक्षकांना याचे लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे.
----------------------------------------
पनवेल महापालिका हद्दीतील गावे आणि वसाहतींमध्ये आयसिटी प्रणालीनुसार घनकचरा संकलन आणि वर्गीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे कामामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील.
- वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.