पनवेल शहर पोलिसांची जुलै महिन्यात धडक कारवाई

पनवेल शहर पोलिसांची जुलै महिन्यात धडक कारवाई

Published on

३८ गुन्ह्यांमध्ये ५७ आरोपी गजाआड
पनवेल शहर पोलिसांची महिनाभरातील धडक कारवाई
पनवेल, ता. १० (वार्ताहर) : शहर पोलिसांनी जुलैमध्ये ३८ गंभीर गुन्ह्यांची उकल करून ५७ आरोपींना गजाआड केले आहे. चोरी, जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक, जादूटोणा, अमली पदार्थ, आयटी ॲक्टच्या गुन्ह्यांचा समावेश असून, ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलिस आयुक्त संजय येनपुरे, परिमंडळ-३चे उप आयुक्त प्रशांत मोहिते यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली आहे.
--------------------------------------
उघड केलेले गुन्हे
- शेतातील गुप्तधन शोधण्याच्या बहाण्याने तौसिफ मुजावर या भोंदूबाबाने पनवेलमधील एका कुटुंबाकडून तब्बल ३९ लाख ७० हजार रुपये उकळून पलायन केले होते. या भोंदूबाबाला कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील चोरलेले दागिने तसेच रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
----------------------------
- अशोक जोतीश घराई (३४) या चोराने तब्बल सव्वासात लाख रुपयांचे आयफोन चोरून ओडिशा येथे पलायन केले होते. हा आरोपी पूरग्रस्त भागात लपून बसला असताना, पनवेल शहर पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने आठ किलोमीटर डिंगीने पाण्यात जाऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून सात लाख २४ हजार ५०० रुपयांचे पाच आयफोन जप्त केले.
----------------------------
- पनवेल बसस्थानक परिसरातील प्रवाशांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्यांना लुटणाऱ्या टोळीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पनवेल रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांच्या बॅग हिसकावणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक करताना ११ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
------------------------------------
- मोबाईल फोन शॉप फोडणाऱ्या टोळीला अटक करून तब्बल चार लाख ९५ हजारांचे ४५ मोबाइल जप्त केले आहेत. तसेच चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
---------------------------------
गुन्हे आरोपी सख्या उघड गुन्हे
वाहनचोरी - ३ ८
जबरी चोरी - १० ६
घरफोडी - ७ ८
इतर चोरी - १७ ७
फसवणूक ३ ५
आयटी ॲक्ट - ९ २
एनडीपीएस - २ १ लाखांचे हेरॉइन जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com