पान २ पट्टा

पान २ पट्टा

Published on

महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ
अलिबाग (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आदिवासीदिनानिमित्त करण्यात आला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आत्माराम धाबे, महिला व बालविकास अधिकारी (जि.प.) निर्मला कुचिक व अन्य मान्यवर उपस्थित होते. पेण प्रकल्पातील न्युक्लिअस बजेट २०२५-२६ अंतर्गत दोन सामूहिक योजना महिला बचत गटांना देण्यात आल्या. याशिवाय चार वैयक्तिक लाभार्थ्यांना थेट योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. यामुळे आदिवासी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळेल. याच कार्यक्रमात रक्षाबंधनाचा उत्सवही साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध भागांतील आदिवासी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
------------------------------------------
तहसील कार्यालयातील ग्रंथालय सुरू
पनवेल (बातमीदार)ः शहरातील अपर तहसील कार्यालयात अत्याधुनिक महसूल ग्रंथालयाचे आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, नायब तहसीलदार संभाजी शेलार, विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या नव्या महसूल ग्रंथालयात सर्वसाधारण वाङ्‍मय, महसूलविषयक संदर्भग्रंथ, कायदेविषयक पुस्तके, तसेच दररोजची नियतकालिके आणि वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत. विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वाचन साहित्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच महसूल आणि कायदेविषयक ज्ञान वाढविण्यास हे ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे. दररोजचे वर्तमानपत्र वाचणे, तसेच महसूल आणि कायदेविषयक पुस्तकांचा अभ्यास करणे आता सुलभ होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com