बांधकाम परवानगीसाठी लाखोंचा गंडा

बांधकाम परवानगीसाठी लाखोंचा गंडा

Published on

बांधकाम परवानगीसाठी लाखोंचा गंडा
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोसायटीची फसवणूक
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या पुष्पकनगरातील भूखंडावर इमारत बांधकामासाठीच्या सर्व परवानग्या मिळवून देण्याच्या प्रलोभनातून एकाने सोसायटीला ३० लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मुंबईसह नवी मुंबईतील विविध शासकीय विभागांत कार्यरत २० अधिकाऱ्यांनी २०१८मध्ये सुखदा को-ऑप. हौसिंग सोसायटीची स्थापना केली होती. त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगच्या पुष्पक नोडमध्ये साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत विमानतळबाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सेक्टर-८मध्ये मिळालेला १११ क्रमांकाचा भूखंड रीतसर विकत घेतला होता. त्याची नोंदणी सोसायटीच्या नावावर करताना इमारत तसेच दुकाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. याच काळात कामोठेत राहणारा प्रकाश कारंडे हा सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. त्याने सिडको, एअरपोर्ट एनओसी, एमएसीबी लाईट कनेक्शन, भिंत बांधणे यासह इतर शासकीय कागदोपत्री प्रक्रियेसाठी मदत करण्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. सोसायटीमधील सर्व सदस्य सरकारी कर्मचारी असल्याने सिडको व इतर शासकीय कार्यालयांमध्ये जाणे शक्य नसल्याने प्रकाश कारंडेला लायझनिंगचे काम दिले होते.
--------------------------------------
नऊ धनादेशांवर स्वाक्षऱ्या
इमारतीसाठी लागणाऱ्या परवानग्या जलदगतीने करून देण्याच्या बहाण्याने कारंडेने सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांच्याकडून नऊ कोऱ्या धनादेश तसेच आरटीजीएसच्या फॉर्मवर स्वाक्षरी घेतल्या. तसेच सोसायटीच्या खात्यातील ३० लाख ५ हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यात वळवून घेतली. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी रक्कम परत देण्यास सांगितले, परंतु कारंडे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com