पटेल आर मार्ट चोरीचा उलगडा

पटेल आर मार्ट चोरीचा उलगडा

Published on

उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : उल्हासनगरच्या लालचक्की चौकातील गजबजलेल्या पटेल आर मार्टमध्ये पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ५२ हजार रुपयांवर हात साफ केला. या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह गुन्ह्यातील महत्त्वाचे धागेदोरे उलगडले.
उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मधील लालचक्की चौकातील पटेल आर मार्ट दुकानात ५ ऑगस्टला पहाटे चारच्या सुमारास चोरीची घटना घडली. दुकानातील ५२ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला. अखेर म्हारळगाव येथे मुख्य आरोपी सागर मैराळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याने हा गुन्हा आपले साथीदार शाखा आणि आदी थोरात यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, साहित्य आणि ५२ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे, हवालदार रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, चंदू गायकवाड आणि सागर मोरे यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com