मुंबई
चार बारवर पोलिसांचा छापा
नवी मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांनी सीबीडी, बेलापूर, रबाळे आणि नेरूळ परिसरातील बारवर छापेमारी करून अश्लील वर्तन तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे.
नवी मुंबई शहरातील लेडीज बार विहित वेळेनंतर सुरू असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (ता. ६), गुरुवारी (ता. ७) आणि शुक्रवारी (ता. ८) सीबीडी-बेलापूर, रबाळे आणि नेरूळ परिसरातील चार बारवर धाडी टाकून २२ जणांवर कारवाई करण्यात आली. या वेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील व बीभत्स हावभाव, विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवल्याचे आढळून आले.