टेम्पो चोरी प्रकरणाचा उलगडा

टेम्पो चोरी प्रकरणाचा उलगडा

Published on

टेम्पो चोरी प्रकरणाचा उलगडा
नवी मुंबई (वार्ताहर) : टेम्पो चोरी प्रकरणाचा एनआरआय सागरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात महाड, पाली परिसरातून एकाला अटक करण्यात आली आहे.
वहाळ गावातील चंदनकुमार माहतो यांचा टेम्पो बेलापूर येथील एका वाहनतळातून चोरण्यात आला होता. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग पाच दिवस मुंबई-पुणे महामार्गावरील सीसीटीव्हींची पडताळणी करताना महाड, पाली (रायगड) येथून अनिकेत उबाळेला अटक केली. अनिकेत काही महिन्यांपूर्वी डी मार्ट येथे चालक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे सर्व माहिती असल्याचा फायदा उचलत त्याने टेम्पोची चोरी केली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com