वाशीत रंगणार महिलांचा श्रावण सोहळा

वाशीत रंगणार महिलांचा श्रावण सोहळा

Published on

वाशीत रंगणार महिलांचा श्रावण सोहळा
नवी मुंबई, ता. १० ः महाराष्ट्र सखी महिला व्यासपीठातर्फे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात महिलांकरिता श्रावण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ऑगस्टला मंगळवारी दुपारी १ ते ७ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला सकाळ माध्यम प्रायोजक आहेत.
महाराष्ट्र सखी महिला व्यासपीठातर्फे महिलांमधील सुप्त कला व गुणांना वाव देण्यासाठी मनोरंजन व व्यवसायासंबंधित कार्यक्रमांचे आयोजन करून संधी दिली जाते. महाराष्ट्र सखीने श्रावण सोहळ्यामध्ये मंगळागौर व मराठमोळा फॅशन शो स्पर्धा होणार आहेत. मंगळागौर स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये रोख रक्कम, ट्रॉफी १५ हजार रुपयांचे मेकअप गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहेत. द्वितीय क्रमांकसाठी तीन हजार रुपयांची रोख रक्कम, तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ स्पर्धकांकरिता एक हजार रुपये व ट्रॉफी आणि गिफ्ट व्हाउचर देऊन गौरव केला जाणार आहे. याप्रसंगी होणाऱ्या फॅशन शोमध्ये पहिला क्रमांकसाठी सोन्याची नथ, ट्रॉफी व १५ हजाराचे गिफ्ट  व्हाउचर देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री हेमांगी राव, चित्रपट निर्माती अर्चना तेंडुलकर, सेलिब्रिटी मॅनेजमेंट अश्विनी शेंडगे, माजी नगरसेविका विनया मढवी, समाजसेविका मोहिनी पाटील, ज्योती ठाकरे, डॉ. शेफाली भुजबळ, नंदिनी विचारे, रंजना नेवाळकर हे प्रमुख पाहूणे उपस्थित राहणार आहेत, तर हिरण्यकेशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रंजना शिंत्रे व महाराष्ट्र सखी संघटनेच्या अध्यक्षा हेमलता गायकवाड निमंत्रक आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com