मुंबई
थळमध्ये गांजा व तलवारींचा साठा जप्त
थळमध्ये गांजा व तलवारींचा साठा जप्त
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) : तालुक्यातील थळ गावातील एका परिसरात शनिवारी (ता. ९) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा, गावठी दारू आणि पाचहून अधिक तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना थळ गावाजवळच्या कनकेश्वर फाटा परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने थळमधील एका व्यक्तीकडून गांजा घेतल्याचे सांगितले. त्यानंतर अलिबाग आणि मांडवा पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकत थळमधील एका घरामधून हा बेकायदा साठा जप्त केला. या छाप्यात गावठी दारू, सुमारे अडीच ग्रॅम गांजा व पाचहून अधिक तलवारींचा साठा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.