महापालिका प्रभागात १४ गावांचा समावेश

महापालिका प्रभागात १४ गावांचा समावेश

Published on

‘त्या’ १४ गावांचा प्रभागरचनेत समावेश
नवी मुंबई पालिकेचा प्रारूप आराखडा सादर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः दिवाळीनंतर होणाऱ्या पालिका निवडणुकांची नवी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ गावांच्या समायोजनाला प्रखर विरोध केला आहे. तरीसुद्धा प्रभागरचनेमध्ये गावांचा समावेश करण्यात आला आहे.
२०२० मे मध्ये नवी मुंबई पालिकेची निवडणूक होणे अपेक्षित होते; मात्र कोविड महामारीमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपल्याने प्रशासक राजवटीखाली कामकाज सुरू झाले. नवी मुंबई पालिकेवर पाच वर्षे प्रशासक राजवट सुरू आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षाअखेरीस राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत नवी मुंबई पालिकेची निवडणूक होणार आहे. २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरताना १११ नगरसेवक संख्या डोळ्यांपुढे ठेवून प्रभागरचना तयार केल्या आहेत. यासाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने १११ जागांचे चार सदस्य पॅनेलनुसार २७ प्रभाग तयार केले आहेत. तर तीन सदस्यांच्या पॅनेलचा एक असे २८ प्रभाग तयार केले असून कल्याण तालुक्यातील १४ गावांचा समावेश केला आहे.
------------------------------------
हरकती, सुनावण्याअंती मंजुरी
महापालिकेने तयार केलेल्या प्रभागरचनांचा प्रारूप आराखडा राज्य सरकारकडे सादर केला आहे. लवकरच हा आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रारूप आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. सरकारच्या मान्यतेनंतर प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रसिद्ध झालेल्या प्रभागरचनांवर हरकती, सुनावण्याअंती रचना मंजूर होणार आहेत.
---------------------------------------
‘या’ गावांचा समावेश
कल्याण तालुक्यातील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नेवाळी, वाकळण, बमनोळी, नारीवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तर शिव आणि गोठेघर अशा १४ गावांचा महापालिका निवडणुकीत समावेश करण्यात आला आहे. १९९० नंतर येथील रहिवाशांना दुसऱ्यांदा पालिका निवडणुकीचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com