विक्रमगडमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.
विक्रमगडमध्ये जागतिक आदिवासीदिन उत्साहात साजरा
बालकांपासून वृद्धांपर्यंतच्या नागरिकांनी सहभाग, कलांचे सादरीकरण
विक्रमगड, ता. १० (बातमीदार) ः आदिवासींच्या हक्कांचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनातील प्रयत्नांसह त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. आदिवासीदिनानिमित्त विक्रमगड शहरात रॅली काढण्यात आली होती. यामध्ये बालकांपासून वृद्धांपर्यंतच्या नागरिकांनी सहभाग घेतला होता. आदिवासी संस्कृतीतील कला दर्शन, तारपा, ढोलनाच, तुरनाच, टपरीनाच आदीविध कलांचे सादरीकरण करण्यात आले.
पालघर जिल्ह्यासाठी म्हणावे तर या जागतिक आदिवासीदिनाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे आपली पूर्वजापासून चालत आलेली आदिवासींची संस्कृती जपली पाहिजे, ती लोप पावत आहे. त्यांचे जतन केले पाहिजे. खासकरून तरुणवर्गाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत किरण गहला यांनी व्यक्त केले.
सुरुवातीला समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विविध मान्यवरांची भाषणे व उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये आमदार हरिश्चंद्र भोये, तारपा प्रतिष्ठान विक्रमगडचे अध्यक्ष डॉ. संदीप वळकर, सचिव योगेश बाबूराव बोरसे, खजिनदार जगन्नाथ चावके, उपाध्यक्ष राहुल धुम, राजा गहला, किरण गहला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी तारपा प्रतिष्ठानचे सदस्य शालिनी कासट, प्रकाश डोले, भरत भोये, रमेश भरसट, भालचंद्र मोरघा, यादव गभाले, रवींद्र भडांगे, मधुकर चौधरी आदींची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.