महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश

महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश

Published on

महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश
पनवेल, ता. १० (बातमीदार) : गेल्या जवळपास १२ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत जनआक्रोश समितीने आता निर्णायक पवित्रा घेतला आहे. महामार्गाच्या कामात वारंवार होणारा विलंब, कंत्राटदार बदल, आर्थिक तरतुदीतील अडचणी आणि प्रशासकीय टाळाटाळ यामुळे काम पूर्णत्वास गेलेले नाही. याचा फटका लाखो प्रवासी आणि स्थानिकांना बसत असून, अपूर्ण रस्ता व धोकादायक वळणांमुळे गेल्या काही वर्षांत शेकडो अपघात झाले, तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जागवण्यासाठी समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा आरंभ पनवेल येथील पळस्पे गावात पाटपूजन कार्यक्रमाने झाला. या वेळी मुंबई-गोवा मार्गावरील प्रवासी, स्थानिक नागरिक तसेच मोठ्या संख्येने चाकरमानी उपस्थित राहिले. उपस्थितांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत ‘काम पूर्ण करा, जीव वाचवा’ अशी मागणी केली. जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादव यांनी सांगितले, ‘‘सरकारने आतापर्यंत अनेक वेळा काम पूर्ण होण्याची तारीख जाहीर केली, पण प्रत्येक वेळी ती पुढे ढकलली. हा महामार्ग फक्त कागदोपत्री पूर्ण होत आहे; प्रत्यक्षात जनतेचे हाल होत आहेत.’’ समितीचे सदस्य विदेश कदम यांनी इशारा दिला, ‘‘आता हा लढा थांबणार नाही. पेण येथून पुढील टप्पा सुरू होईल आणि त्यानंतर लांजा ते मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा काढला जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com