स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम चळवळ ग्रामीण भागात राबवणार

स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम चळवळ ग्रामीण भागात राबवणार

Published on

स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम चळवळ ग्रामीण भागात राबवणार
माजी सरपंच दिनेश म्हात्रे यांचे प्रतिपादन
वसई, ता. १० (बातमीदार) ः शिक्षण घेत असताना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे सिद्धार्थ फाउंडेशनची स्थापना झाली. ग्रामीण भागातील मुले-मुली नाव उज्ज्वल करीत आहेत; मात्र आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण घेताना अडचणी येत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळले पाहिजे. जेणेकरून उच्च पदावर वसईचे नाव उंचावेल. अभ्यासक्रमासाठी लागणारी महागडी पुस्तके उपलब्ध व्हावी, असे सुसज्ज अभ्यासिका केंद्र व वाचनालय चळवळ राबवणार असल्याचे प्रतिपादन कामण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश म्हात्रे यांनी केले.
वसई पूर्वेकडील कामण येथील हनुमान मंदिर परिसरात सिद्धार्थ फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी दहावी, बारावी, पदवीधर आणि पदव्युत्तर परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी उपसरपंच व सिद्धार्थ फाउंडेशनचे दिनेश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे, महादेव पाटील, दिनेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश म्हात्रे, कल्पक म्हात्रे, पोलिस पाटील प्रथमेश विरारकर, रमेश जाधव, रत्नाकर सावंत, चंदन शिंगरे यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
आजचे युग स्पर्धात्मक झाले आहे. शिक्षणात स्पर्धा निर्माण होऊ लागली आहे. दहावी-बारावीनंतर आपण पुढेही शिकले पाहिजे. महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे सरन्यायाधीश झाले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वसईतील कामण गावातील विद्यार्थ्यांनी पुढे जावे. मिलिटरी यासह उच्च शिक्षण घेण्यासाठी आवड निर्माण करावी. आजकाल गावात गल्लोगल्ली क्रिकेटचे वेड लागले आहे, ही शोकांतिका आहे. खेळातून पुढे गेले तर उपयोग आहे; मात्र वेळ वाया घालवू नका, असे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले. या वेळी शैक्षणिक साहित्यवाटप, कॅन्सर शिबिर, करिअर मार्गदर्शन, पर्यावरणपूरक उपक्रम यासह विविध संकल्पना राबवत असलेल्या सिद्धार्थ फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com