साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचा कला महोत्सव

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचा कला महोत्सव

Published on

किन्हवली, ता. ११ (बातमीदार) : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठानतर्फे उल्हासनगर येथे सांस्कृतिक कला महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शहापूर तालुक्यातील खर्डी विभागीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप अधिकारी यांना ‘कर्मवीर जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर येथील साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठानने टाऊन हॉलमधील रंगमंदिरात कला महोत्सव पार पडला. याप्रसंगी अधिकारी यांना आमदार कुमार आयलानी, आयोजक प्रकाश जाधव व उल्हासनगर महापालिका मुख्य वाहन विभागप्रमुख विनोद केणे यांच्या उपस्थितीत कर्मवीर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्याचे ह.भ.प. परशुराम माळी महाराज यांना ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ पुरस्कार, तर अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री केतकी माटेगावकर, गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका ऊर्मिला धनगर यांना ‘महाराष्ट्र कला गौरव’ पुरस्कार देण्यात आले. विशाल रसाळ व सोनल रसाळ यांना ‘महाराष्ट्र संगीत रत्न’ आणि खर्डी येथील मनीष दोंदे यांना पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या वेळी मंचावर हास्य कलाकार पृथ्वी प्रताप, संदीप गायकवाड, प्रकाश भागवत यांची विशेष उपस्थिती होती. सोहळ्यासाठी विनोद शिंदे, प्रफुल केदारे, राकेश जाधव, पप्पू जाधव, बबलू कांबळे, दिलीप थोरात, विपुल दोंदे यांनी मेहनत घेतली.

ग्रामीण भागातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा शहरी व्यासपीठावर सन्मान व्हावा, हा मूळ हेतू आहे. यासाठी २० वर्षांपासून हा सोहळा घेत आहोत.
- प्रकाश जाधव, अध्यक्ष,
साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठान उल्हासनगर

किन्हवली : शहापूर तालुक्यातील खर्डी येथील दिलीप अधिकारी यांना कर्मवीर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com