नाॅईस बॅरियर'' च्या पत्र्यांवर चोरांचा डल्ला.
कर्नाळा अभयारण्यात वाहनांचा गोंगाट
‘नॉइस बॅरियर’च्या पत्र्यांची चोरी
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ११ (बातमीदार)ः मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये, म्हणून बसवलेल्या नॉइस बॅरियरच्या पत्र्यांवर चोरांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे अभयारण्य परिसरात वाहनांचा गोंगाट वाढला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरचे काम करण्यात आले, पण वेगाने धावणाऱ्या वाहनांचा वन्यजीवांना उपद्रव तसेच वनस्पतींनाही बांधा येईल, असा मुद्दा राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाकडून २०१५ ला उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आवाज प्रतिबंधात्मक यंत्रणा बसवण्याची सूचना मंडळाकडून करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मागणीला हिरवा कंदील देण्यात आला. त्यानुसार जवळपास दीड किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूने नॉइस बॅरियर बसवण्यात आले, परंतु पत्र्यांची चोरी करण्यात आली असून, लाखो रुपयांची यंत्रणाच चोरी करण्यात आली आहे.
---------------------------------------
यापूर्वीही चोरीचे प्रकार
मुंबई-गोवा माहामार्गावर कर्नाळा अभयारण्यात १.२ किलोमीटर अंतरावर नॉइस बॅरियर लावण्यात आलेले आहेत. दोन्ही दिशेवरील मार्गावरचे बॅरियर काढलेले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी चोरीला गेलेले काही बॅरियर हस्तगत केले होते. आता भागात नॉइस बॅरियर चोरीला गेले होते. त्या भागासाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्याचे न्हाईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------------------------------------
चोरांच्या त्रासाने नवी शक्कल
बॅरियर दोन लोखंडी रॉडच्या चौकटीमध्ये नटबोल्टच्या सहाय्याने बसवण्यात आल्याने साच्यातून बाहेर पडत होते. त्यामुळे चोरी करणे सोयीचे होत होते, मात्र आता वेल्डिंग केली जाणार असल्याने चोरी करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
----------------------------
कर्नाळा अभयारण्यात वन्यजीव आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे त्यांच्या अधिवासाला अडचण येऊ नये म्हणून अभयारण्य परिसरात दोन्ही बाजूने आवाज रोधक यंत्रणा बसवण्यात आली होती, परंतु त्याचे पत्रेच चोरण्यात आले आहेत. यामुळे अभयारण्य परिसरातील शांतता भंग होणार आहे. संबंधित यंत्रणांकडून गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
- सचिन गोडसे, पर्यावरणप्रेमी
--------------------------------
कर्नाळा अभयारण्यातील मुंबई-गोवा महामार्गालगतच्या तुटलेल्या नॉइस बॅरियरसंदर्भात कळवले असून, दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार कंपनी निवडली आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे.
- नारायण राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा
़़़़़़़़़़़़़
दरम्यान, कर्नाळा अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत, याशिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक, तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.