सूका आणि ओल्या कचऱ्याला एकच वाहन

सूका आणि ओल्या कचऱ्याला एकच वाहन

Published on

कचरा वर्गीकरणाला हरताळ
ओला, सुकासाठी एकच वाहन, महापालिकेचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ ः शहरात ओला, सुका कचरा वर्गीकरणावर पालिका भर देत आहे. त्याकरिता कंत्राटदाराची नियुक्ती करताना रहिवाशांचे प्रबोधन सुरू आहे, पण वेगळा केलेला कचरा एकाच वाहनातून जात असल्याने स्वच्छतेच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.
नवी मुंबई शहरात प्रशासनाकडून स्वच्छतेवर भर देण्यात येतो. त्याची फलश्रुती म्हणून नवी मुंबई शहर अनेकवेळा राज्यात स्वच्छतेत अव्वल ठरले आहे. देशात नवी मुंबईचा दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ भारत अभियान स्पर्धेचे वेगवेगळ्या पातळीवर स्पर्धेचे नियम बदलत जातात. त्याप्रमाणे स्वच्छतेमध्येही आमूलाग्र बदल केले जातात. कचरा गोळा करण्यासोबतच कचरा वर्गीकरणाला स्वच्छ भारत अभियानात खूप महत्त्व आहे. नवी मुंबईत ८० टक्के नागरिक कचरा वर्गीकरण करून देतात. तुर्भे येथील क्षेपणभूमीवर शहरातून गोळा झालेला कचरा घेऊन जातात. त्या ठिकाणी कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, पण दिघा विभागात बऱ्याचशा गृहिणी घरातील कचरा आणि स्वयंपाक करून झालेला ओला-कचरा थेट रस्त्यावर नेऊन टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबत माहिती देण्यासाठी वारंवार वेगवगेळ्या पथकाद्वारे जनजागृती केली जात आहे. वाहनांबद्दल नियोजन केल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे यांनी सांगितले.
---------------------------------------
या ठिकाणी सर्वाधिक तक्रारी
दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, सीबीडी-बेलापूर भागात रोज सकाळी एकच कचऱ्याची गाडी जात असल्याच्या तक्रारी येथील नागरिक करीत आहेत. लोकप्रतिनिधीही महापालिकेकडून एकच गाडी येत असल्याची तक्रार करीत आहेत.
--------------------------------------
कोट्यवधी पैशांचा चुराडा
नवी मुंबई पालिकेतर्फे शहरातून सुमारे साडेसातशे किलो कचरा दैंनदिन स्वरूपात गोळा केला जातो. हा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने प्रति वाहनामागे पैसे दिले आहेत. महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. सध्या कचऱ्याच्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी आयटीएमस अत्याधुनिक प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने पुन्हा कोट्यवधी खर्च केले आहेत, परंतु कचऱ्याचे वर्गीकरणच होत नसल्याने जनतेचा पैसा पाण्यात गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
-------------------------------------------
लोकप्रतिनिधींकडून नाराजी
- दिघा विभागातील बिंदू माधव नगर, दिघा गाव, गणेश नगर, आंबेडकर नगर, ईश्वरनगर, विष्णूनगर, इलठणपाडा, संजयनगर, नामदेवनगर या भागात कचरा उचलण्यासाठी गाड्या येत नाहीत. नागरिकांनी वेगवेगळा केलेला कचरा एकाच गाडीतून घेतला जातो, अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी दिली.
- ऐरोली शहर आणि गावात नागरिक कचरा वर्गीकरण करत आहेत, पण दोन्ही कचरा एकाच वाहनातून घेतला जातो, असे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले. अशीच परिस्थिती कोपरखैरणे, वाशी सेक्टर-६ आणि ७ या भागात असल्याचे माजी नगरसेवक शिवराम पाटील, माजी नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी सांगितले.
--------------------------------
काही भागांमध्ये दोन वेगवेगळ्या कचरा गोळा करणाऱ्या वाहने जाण्याऐवजी एकच वाहन जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल. सुका, ओला कचरा घेण्यासाठी वेगवेगळी वाहने पाठवण्यात येतील.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई पालिका
----------------------------------
कचरा वर्गीकरण
दिवसाला - ७५० किलो
रहिवासी सहभाग - ८० टक्के नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com