नेरूळ येथील रुग्णालयाला आग
नेरूळमध्ये रुग्णालयाला आग
२१ रुग्णांना सुरक्षित बाहेर काढले
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर-६ येथील पाम बीच रोडवरील शुश्रूषा रुग्णालयाच्या तळघरात साेमवारी (ता. ११) दुपारी १२.३०च्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच नेरूळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही मिनिटांतच आग आटोक्यात आणून २१ रुग्णांना सुरक्षित बाहेर काढून अन्यत्र हलविण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमनच्या प्राथमिक तपासानुसार, तळघरातील एसीच्या वीज यंत्रणेत शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज आहे. येथे उपचार घेणाऱ्या २१ रुग्णांना तत्काळ पनवेल येथील शुश्रूषा व वाशी येथील फोर्टीस रुग्णालयात रुग्णवाहिकेतून सुखरूप हलवण्यात आले. या घटनेवेळी रुग्णालयातील आयसीयूमध्ये चार, तर इतर वॉर्डमध्ये १७ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील ४२ कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालयाच्या बेसमेंटमधून मोठ्या प्रमाणात धूर वरच्या मजल्यावर पसरल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.
...
रुग्णालय इमारतीच्या तळघरात ठेवलेले स्टेशनरी साहित्य पूर्णपणे जळाले असून, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणली. रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे डिसेंबर २०२४ पासून लेखापरीक्षण झालेले नसून, यासाठी रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- पुरुषोत्तम जाधव, वाशी अग्निशमन अधिकारी
...
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तळघरातील एसीच्या वीज यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता आहे. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाइकांना व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. आग पूर्णपणे विझली असून, शोध आणि बचावकार्यासाठी पोलिसांचेदेखील सहकार्य लाभले.
- गजेंद्र सुसविरकर, अग्निशमन अधिकारी
...
रुग्णालयाच्या तळघरात एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. आगीमुळे पहिल्या मजल्यावर धूर झाला होता. एकूण २१ रुग्ण येथे दाखल होते. सर्व रुग्णांना सुरक्षितरीत्या पनवेल येथील शुश्रूषा व वाशी येथील फोर्टीसमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनादेखील सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
- अश्विनी कुलकर्णी, व्यवस्थापक, शुश्रूषा हॉस्पिटल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.