विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी

विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी

Published on

स्कूल व्हॅनला सरकारची मंजुरी
सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराची संधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्य सरकारने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल व्हॅनला मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान, स्कूल व्हॅनला परवानगी देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. 
परिवहन विभागाने पालक आणि बस संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीच्या धर्तीवर स्कूल व्हॅन नियमावली तयार केली आहे. चारचाकी आणि १२+१  आसनक्षमतेपर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनांना शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. ही वाहने बीएस-६ श्रेणीतील असणार आहेत. त्यात चालकास ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक, आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा सुरक्षा उपायांचा समावेश असणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
----
नियमावली निश्चित
राज्य सरकारकडून २०१८पर्यंत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते; मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या मानकांनुसार राज्य सरकारने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबत सूचना प्रसिद्ध केली. त्याआधारे राज्य सरकारने हे धोरणात्मक पाऊल टाकले असून लवकरच अधिसूचना जारी होईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य आहे. तसेच बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅनला मंजुरी देण्यात येत आहे. स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
....
स्कूल व्हॅनमधील वैशिष्ट्ये
- जीपीएस
- सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन
- अग्निशमन अलार्म प्रणाली
- दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा
- ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर
- पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे
- स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी
- गाडीच्या छतावर शाळेचे नाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com