अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार
बांगलादेशच्या अल्पवयीन मुलीवर तीन राज्यांत अमानुष अत्याचार
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नऊ दलालांना अटक
नालासोपारा, ता. ११ (बातमीदार) : १२ वर्षांच्या मुलीचा अतिशय अमानुषपणे छळ करून तिला गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांत वेश्याव्यवसायासाठी फिरवल्याचे आणि २००पेक्षा जास्त वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचे नायगाव पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे निष्ठुर दलालांनी पैशाच्या हाव्यासापोटी एका उमलणाऱ्या कळीचे आयुष्य बरबाद केल्याने समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
या अल्पवयीन बांगलादेशी मुलीला सेक्स रॅकेट चालविणाऱ्या बांगलादेशी दलाल महिलेने बांगलादेशवरून कलकत्तामार्गे महाराष्ट्रात आणले. तिला चटके दिले. तिचे हार्मोन्स वाढविण्यासाठी इंजेक्शन दिले. तिचे बोगस आधार कार्ड बनवून तिचे वय २१पेक्षा जास्त दाखवले. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांत तिच्यावर अमानुष अत्याचार झाल्याचे पोलिस तपासात नुकतेच उघड झाले आहे. हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एकूण नऊ दलालांना अटक करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने वसईच्या नायगावमध्ये २६ जुलैला छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. दोन पीडित तरुणींची सुटका करीत तीन दलालांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरविली असता, मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
पीडित मुलीला गुजरातवरून वसईच्या नायगाव येथील एका रूममध्ये वेश्याव्यवसायासाठी आणणार असल्याची माहिती मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. यावरून २६ जुलैला या पथकाने नायगावमध्ये छापा टाकून दोन पीडित तरुणी आणि तीन दलालांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवली.
...
नऊ दलालांना अटक
नायगाव पोलिसांनी या सर्व तपासात एका आंतरराज्य सेक्स रॅकेट टोळीचा भांडाफोड केला असून, एकूण नऊ दलालांना अटक केली आहे. मोहम्मद खालिद अब्दुल बापारी (वय ३३), जुबेर हारून शेख (३८), शमीम गफार सरदार (३९), रुबी बेगम मोहम्मद खालिद बापारी (२१), उज्जल अमित कुंड ऊर्फ बुढा ऊर्फ अली (३५), परवीन उज्जल कुंड ऊर्फ शिला बेगम (३२), प्रीतीबेन सुरेंद्र मोहिडा (३७), निकेत विजयभाई पटेल (३५), सोहेल शुभान शेख (२३ ) अशी अटक दलाल आरोपींची नावे असून, यातील सहा जण हे बांगलादेशचे आहेत, तर दोन गुजरात आणि एक महाराष्ट्राचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.