‘ते’ वडाचे झाड संरक्षित
बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिका चौक परिसर रुंद करण्याचे काम सुरू आहे. यात अडथळा ठरणारी अनेक झाडांचे पुनर्रोपण केले जात आहेत. पश्चिमेकडील दत्त चौकातील शेकडो वर्षे जुने वडाचे झाडही स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू असताना विविध स्तरांतील व्यक्तींसह नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. आता परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशीष दामले यांनीही पुढाकार घेऊन झाड न हटविण्याची विनंती केली आहे.
बेलवली रोडवरील दत्त चौकातील हे जुने वडाचे झाड परिसराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. या झाडाखालील सावलीत खेळलेली पिढी, झुलणाऱ्या पारंब्यांशी निगडित आठवणी या सर्वामुळे बदलापूरकरांशी याचे भावनिक नाते आहे. मात्र, झपाट्याने वाढणारे शहर आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी यामुळे पालिकेने झाड हलविण्याचा विचार केला होता. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी चौक परिसर रुंद करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामात अडथळा अनेक झाडांचे पुनर्रोपण करून कोंडीच्या समस्येला हात घातला आहे. दत्त चौकातील जुने वडाचे झाडही अन्यत्र हलविण्याची हालचाल पालिकेकडून सुरू आहे. याबाबत अनेक जाणकार, नागरिक आणि पत्रकारांनी हे झाड हटवू नये, अशी विनंती केली. आशीष दामले यांनीही मुख्याधिकारी गायकवाड यांना दूरध्वनीवरून झाड हटवू नये, अशी विनंती केली. याला पर्यायी काही उपाय करता येतोय का, याची पाहणी करण्याची विनंतीही त्यांनी पालिकेला केली आहे.
-------------
हे झाड या परिसराची खरी ओळख आहे. नागरिकांप्रमाणे लहानपणापासून या झाडासोबत माझ्याही भावना जोडल्या आहेत. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना संपर्क साधून बदलापूरकरांच्या भावनांचा आदर करून झाड हटवू नये, अशी विनंती केली आहे. गायकवाड यांनीही या संदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे.
- आशीष दामले, अध्यक्ष,
परशुराम आर्थिक विकास महामंडळ
-------------------
बदलापूरकरांच्या विनंतीचा विजय
दत्त चौकातील वडाचे झाड हलवू नये, यासाठी सर्व स्तरातून आणि दामले यांनीही पालिकेला भावनिक आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी झाड पाडण्याचा निर्णय रद्द केला आहे. झाड न हटविता पर्याय शोधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिका प्रशासनाच्या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.