शेवाळामुळे कल्याणातील पायवाट निसरड्या
शेवाळामुळे कल्याणातील पायवाटा निसरड्या
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे फुटपाथ आणि अंतर्गत पायवाटांवर मोठ्या प्रमाणात शेवाळ वाढलेले आहे. या शेवाळामुळे अनेक ठिकाणी पायवाटा खूपच निसरड्या झाल्या असून, नागरिकांना चालताना मोठी अडचण येत आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुलं आणि दिव्यांगांसाठी ही समस्या गंभीर ठरत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा निसरड्या पायवाटांवरून पडून अनेकांना डोक्याला, हात-पायांना जखमा होणे किंवा अगदी हाडे मोडणे यासारख्या गंभीर अपघातांचा सामना करावा लागतो.
सततचा ओलावा आणि कमी सूर्यप्रकाशामुळे काँक्रीट व दगडी पायवाटांवर हिरव्या रंगाचा शेवाळाचा थर साचतो. यामुळे पायवाटा अत्यंत निसरड्या होतात आणि चालताना घसरून पडण्याची शक्यता वाढते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी, चिकणीपाडा, सिद्धार्थनगर, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी आणि खडेगोळवली अशा गवताळ भागांमध्ये ही समस्या विशेष गंभीर आहे. नागरिकांकडून पायवाटांची नियमित स्वच्छता करण्याची मागणी जोर धरत आहे. अनेकांनी सुचवले की, शेवाळ हटवण्यासाठी व्हिनेगर, ब्लीचसारखे उपाय वापरले जात असले, तरी पावसाळ्याच्या दिवसांत पुन्हा शेवाळ वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम राबवणे अत्यंत गरजेचे आहे.
सावधगिरी बाळगा
निसरड्या पायवाटांवरून घसरून पडण्याचा अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य चपला किंवा शूज वापरणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वेळोवेळी स्वच्छता आणि देखभाल करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पावसाळ्यात आमच्या हॉस्पिटलमध्ये पाय घसरून पडलेल्या अनेक रुग्णांची भेट होते. यामध्ये काहींना जखमा होतात तर काहींना हाडे मोडण्याचा धोका असतो. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांनी चालताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो कोरड्या जागेवरून चालावे आणि घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा.
- डॉ. प्रमोद बैरागी, चिकित्सक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.