भिवंडी खार्डी येथे दोघा जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या,

भिवंडी खार्डी येथे दोघा जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या,

Published on

भिवंडीत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यासह दोघांची हत्या
भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील खार्डी येथे सोमवारी (ता. ११) रात्री उशिरा भाजप जनता युवा मोर्चाचे ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल तांगडी आणि तेजस हे त्यांच्या जेडीटी इंटरप्रायसेस या कार्यालयात बसले होते. रात्री ११च्या सुमारास ते घरी जाण्यासाठी निघत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वर्मी घाव बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
प्रफुल्ल तांगडी हे रिअल इस्टेट व्यावसायिक होते. यापूर्वीही त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. ही हत्या व्यावसायिक वैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले असून, भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर खार्डी गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. गावात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दल व दंगल नियंत्रण पथकाचे पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, उमेश तांगडी याने दिलेल्या तक्रारीवरून भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात विकी भरत म्हात्रे, कल्पेश रामदास वैती, अजय सुरेश तांगडी, महेंद्र नामदेव तांगडी, दयानंद नामदेव तांगडी, सुनील सुभाष भोईर, प्रसाद गजानन तांगडी, मोहन बाळकष्ण तांगडी, नऊस नरेश नांदुरकर, विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम व जितेश मधुसुदन गवळी अशा १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हत्याकांडाला राजकीय वळण?
भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावात प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाईची मागणी केली. मयत प्रफुल्लचा चुलत भाऊ उमेश तांगडी यांनी आरोपी विकी म्हात्रे आणि इतरांना खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांचे राजकीय पाठबळ असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आणि भाजपा नेत्यांनी समजूत काढल्यावर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com