धाग्यांनी अडवली हार्बर रेल्वेची वाट
धाग्यांनी अडवली ‘हार्बर’ची वाट
ओव्हरहेड वायरवर धागा अडकल्याने लोकल ठप्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : हार्बर मार्गावरील मशीद बंदर ते सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर धागा अडकल्याने काही कालावधीसाठी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी सीएसएमटीवरून वाशी, बेलापूर, पनवेल आणि गोरेगावकडे जाणाऱ्या लोकलला विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.३२च्या सुमारास मशीद बंदर ते सँडहर्स्ट रोडदरम्यान डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायरवर धागा लटकत असल्याचे मोटरमनच्या निदर्शनास आले. अशा परिस्थितीत विजेचा संपर्क तुटण्याची, ठिणग्या उडण्याची किंवा अपघाताची शक्यता असल्याने मोटरमनने तत्काळ गाडी थांबवली. यासंदर्भात नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यावर मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी व ओएचई देखभाल पथक घटनास्थळी धावले. त्यांनी ओव्हरहेड वायरवरील धागा काढल्यावर लोकल वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली; मात्र यादरम्यान डाऊन मार्गावरील अनेक लोकल थांबवण्यात आल्याने वेळापत्रकावर परिणाम झाला. परिणामी, सकाळी कार्यालयात तसेच शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्यांना विलंब झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.