कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत विलंब
कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत विलंब
गती देण्याची आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः मुंबई महापालिकेतील नगर अभियंता खात्यातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत) भरती प्रक्रिया जवळपास नऊ महिन्यांपासून रखडल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित उमेदवारांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून, उच्च न्यायालयात या प्रकरणाची तातडीने सुनावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.
महापालिकेने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी कनिष्ठ अभियंता पदांसाठी जाहिरात काढली होती, मात्र ४ डिसेंबर २०२४ रोजी काही पदवीधर उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांना तात्पुरती परीक्षा देण्याची परवानगी दिली आणि त्यानुसार २, ३ व ८ मार्च २०२५ रोजी परीक्षा पार पडल्या. उमेदवारांच्या मते, पदवीधरांच्या वकिलांनी ५ डिसेंबर २०२४ रोजीच आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, तर महापालिकेने आपले प्रतिज्ञापत्र सुमारे सहा महिन्यांनी २ जुलै २०२५ रोजी सादर केले. दरम्यान, १७ एप्रिल, २ मे, २७ जून व २५ जुलै रोजी न्यायालयात सुनावणीची तारीख असूनही तातडी न दाखवल्याने प्रकरण बोर्डावर न आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. आता पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे. भरती प्रक्रिया लांबणीवर गेल्याने उमेदवारांचे भवितव्य अनिश्चिततेत अडकले आहे. महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने आणखी विलंब होऊ शकतो, म्हणून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी विनंती उमेदवारांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.