महानिर्मितीच्या १७० मेगावॉटच्या सौर प्रकल्पातून महिनाअखेर वीजनिर्मिती

महानिर्मितीच्या १७० मेगावॉटच्या सौर प्रकल्पातून महिनाअखेर वीजनिर्मिती

Published on

महिनाअखेर सौर ऊर्जा प्रकल्पातून १७० मेगावॉट वीजनिर्मिती
महावितरणद्वारे कृषीपंपाला वीजपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महानिर्मितीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारलेल्या १७० मेगावाॅट क्षमतेच्या विकेंद्रित सौर प्रकल्पातून महिनाअखेर वीजनिर्मिती सुरू होणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील १० प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांची कामे अंतिम टप्प्यात असून, या प्रकल्पात तयार होणारी वीज महावितरणच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला पुरवली जाणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत २ ते १० मेगावाॅट क्षमतेचे विकेंद्रित वीज प्रकल्प उभारले जात आहेत. त्यानुसार महानिर्मितीकडून अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ ठिकाणी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १० ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प नियोजित आहेत. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारगाव १५ मेगावाॅट, पारनेर १३ मेगावाॅट, भाळवणी १५ मेगावाॅट, शेवगाव अर्बन १२ मेगावाॅट, मिडसांगवी नऊ मेगावाॅट, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव १५ मेगावाॅट, बेलवंडी मेगावाॅट, चिंभळे १५ मेगावाॅट, विसपूर १५ मेगावाॅट, तीसगांव १३ मेगावाॅट, चापडगाव १९ मेगावाॅट आणि शहरटाकळी १५ मेगावाॅट या प्रकल्पांची कामे वेगात सुरू आहेत. महिनाअखेरपर्यंत हे प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांनी नुकतीच भेट देऊन प्रकल्पांची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com