गाझा येथील नरसंहाराविरुद्ध निदर्शनाचे प्रकरण :
गाझासंदर्भात निदर्शने करण्यास परवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः गाझामधील नरसंहाराच्या निषेधार्थ आझाद मैदानात आंदोलन करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) मागणी अखेर उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. १२) मान्य केली. शांततापूर्ण वातावरणात येत्या २० ऑगस्टला दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत निदर्शने करण्यास परवानगी दिली.
न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी माकपची याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, २० किंवा २५ ऑगस्ट या दोनपैकी कोणत्याही एका तारखेला माकपला आझाद मैदान येथे निदर्शने करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत शांततापूर्ण मार्गाने निदर्शने केली जातील, असे माकपच्या वतीने अॅड. मिहिर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावेळी द्वेषपूर्ण भाषण अथवा घोषणा देणार नाही याबाबत कसे आश्वासित कराल, अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्यांकडे केली. त्यावर आंदोलन शांततापूर्ण असेल आणि आयोजक कायद्याअंतर्गत प्रस्तावित सार्वजनिक सभा, आंदोलने आणि मिरवणुकांसाठीच्या मसुद्याच्या नियमांचे पालन करतील, असे आश्वासन देसाई यांनी न्यायालयाला दिले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने माकपला आझाद मैदान येथे निदर्शन करण्यास परवानगी देऊन याचिका निकाली काढली.
...
शेवटी विजय आमचाच झाला
जगभरातून नरसंहाराच्या निषेधार्थ आंदोलने सुरू झाली. १७ जुलैला भारतातही आंदोलन कऱण्यात आले. त्यावेळी आम्ही मुंबई १८ जुलैला आंदोलन करण्याचे ठरवले. परंतु, परवानगी नाकारण्यात आली. माझ्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे सर्व राजकीय दबावामुळे झाले; पण आज शेवटी विजय आमचाच झाला, असे सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठबोरवाला यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.