मुरबाडमध्ये रंगणार जनसेवा दहीहंडी उत्सव
टोकावडे, ता. १३ (बातमीदार) : मुरबाड शहरात ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या जनसेवा प्रतिष्ठानतर्फे यंदाही भव्य आणि आगळावेगळा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गोपाळकाला निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.
दहीहंडी उत्सवात मानाच्या दहीहंडीला ५५ हजार ५५५ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सात थरांना ९ हजार ९९९ रुपये, सहा थरांना सहा हजार ६६६ रुपये, पाच थरांना पाच हजार ५५५ रुपये आणि चार थरांना दोन हजार २२२ रुपये; तसेच प्रत्येकास सन्मानचिन्ह असे आकर्षक बक्षीस असणार आहे. यंदाच्या कार्यक्रमात मुरबाडी बाप्या माणूस खंड्या दादा शिंदे आणि मुरबाडी बाई माणूस प्राची ताई पाटील हे खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असून, त्यात दोन सायकली, तीन मिक्सर, तीन हेल्मेट आणि पाच कुकर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. जनसेवा प्रतिष्ठानने यापूर्वी तालुक्यातील दीड हजार भाविकांना मोफत तिरुपती बालाजी दर्शन घडवून आणले आहे. मुरबाड कला क्रीडा महोत्सव आयोजित करून स्थानिक कलाकार व खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक ॲप्लिकेशन देऊन गुणगौरव, अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शनाची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांचे विमा उतरवणे, आरोग्य तपासणी यांसारखे सामाजिक उपक्रम प्रतिष्ठान सातत्याने राबवत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.