गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्ते

गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्ते

Published on

मुरबाड, ता. १३ (वार्ताहर) : तालुक्यातील मुरबाड-शिरगाव-चिखले व मुरबाड-पवाळे-बोरगाव हे रस्ते तत्काळ आणि कायमस्वरूपी खड्डेमुक्त करण्याबाबत; तसेच चिखले पुलाची उंची व रुंदी वाढवण्याबाबत तहसील कार्यालयात मंगळवारी (ता. १२) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
शिरगाव हनुमान मंदिर ते तहसील कार्यालय मुरबाडदरम्यान १ ऑगस्टला झालेल्या पदयात्रेत रस्त्यांची दुरुस्ती, पुलाची उंची वाढवणे आणि विजेचा लपंडाव थांबवणे या मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मागण्यांवर पुढील कार्यवाहीसाठी ही बैठक घेण्यात आली. ही बैठक तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे, उपअभियंता संजय कोरडे, निवासी नायब तहसीलदार बांगर, महावितरणचे अभियंता जाधव, कनिष्ठ अभियंता युवराज यशवंतराव, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, तुकाराम चोरगे, रजाक शेख, नेताजी लाटे उपस्थित होते. दोन्ही रस्ते तातडीने खड्डेमुक्त करून गणेशोत्सवापूर्वी कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाईल. नाबार्डअंतर्गत चिखले नवीन पुलाचे; तसेच मुरबाड-चिखले ५.५ मीटर रुंद सिमेंट काँक्रीट रस्त्याचे विकास आराखडा तातडीने तयार करून वरिष्ठांकडे सादर केले जाईल, असे उपअभियंता संजय कोरडे यांनी सांगितले. महावितरणचे अभियंता जाधव यांनी, विजेच्या वाहिनीशी संबंधित अडचणी सात दिवसांत सोडवण्याचे आणि २४x७ संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

लोकप्रतिनिधींचा आग्रह
चेतनसिंह पवार यांनी, अधिकाऱ्यांनी स्वतः तालुक्यातील उपेक्षित भागांची पाहणी करून लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहता, गरजेच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच वरील सर्व कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com