४ लाख वाहनधारक रडारवर
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १३ : जुन्या वाहनांना सुरक्षा वाहन क्रमांक (एचएसआरपी) बंधनकारक आहे. पण पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यक्षेत्रातील चार लाख ५८ हजार वाहनधाकरांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
जुन्या वाहनांना सुरक्षा वाहन क्रमांक लावण्यासाठी १५ ऑगस्टची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी शासनाने चार वेळा मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे भविष्यात मुदतवाढ मिळणार नसल्याने अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईची शक्यता आहे. पनवेल परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पनवेल परिसरातील चार लाख ५८ हजार वाहनांना सुरक्षा क्रमांक बसवलेला नाही. आता फक्त दोन दिवस वाहनधारकांच्या हातात असल्याने एवढ्या कमी वेळात ही प्रक्रिया होणे अशक्य असल्याने कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
--------------------------
एक ते पाच हजारांचा दंड
ज्या वाहनांनी सुरक्षा वाहन क्रमांक अद्याप बसवलेला नाही किंवा १५ ऑगस्टपर्यंत यासाठी बुकिंगही करणार नाहीत, त्यांना वायूवेग पथकाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास पहिल्यांदा एक हजारांचा दंड, त्यानंतर दोन हजार आणि त्यानंतर पाच हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
-----------------------------
वाहनांची संख्या - पाच लाख ३८ हजार
आरक्षित वाहन क्रमांक - १ लाख १८ हजार ७००
सुरक्षा क्रमांकाची वाहन संख्या ः ८० हजार
----------------------------------
१० ठिकाणी केंद्रे
जुन्या वाहनांना सुरक्षा वाहन क्रमांक बसविण्याचे काम १० एजन्सींना देण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात अशा वाहनांना नंबर प्लेट लावण्याचे काम करणार आहे. पनवेलमध्ये १० सेंटरवर ही सुविधा देण्यात आली आहे.
-----------------------------------
सुरक्षा वाहन क्रमांक वाहनधारकांसाठी महत्त्वाचा आहे. राज्य शासनाने पुन्हा चार महिने मुदतवाढ दिल्यानंतरही बहुतांश वाहनधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. १५ ऑगस्टनंतर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग कारवाई तसेच दंड आकारणी करणार आहे.
- नीलेश धोटे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.