मुंबईतील रात्र शाळांना घरघर,

मुंबईतील रात्र शाळांना घरघर,

Published on

मुंबईतील रात्रशाळांना घरघर
पटसंख्येअभावी १२० पैकी १७ शाळा संकटात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई परिसरातील कष्टकरी, कामगार आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तरुणांना शिक्षणाची संधी देणाऱ्या रात्रशाळांना घरघर लागली आहे. सरकारचे धोरण आणि मुंबईतील मराठी माणसाचे मुंबईबाहेर होत असलेले स्थलांतर यामुळे रात्रशाळांमधील पटसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या कार्यरत असलेल्या १२० पैकी १७ हून अधिक रात्रशाळा अखेरच्या घटका मोजत आहेत.
मुंबईत १२० रात्रशाळा कार्यरत असून, त्यात २५० हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी ७७ शिक्षक हे सकाळी अनुदानित शाळेत पूर्णवेळ वेतन घेऊन रात्रशाळेतही अतिरिक्त वेतन घेतात. १२० पैकी ४५ शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक कार्यरत असून, सध्या या शाळांमध्ये चार हजार २०० हून अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. मागील काही वर्षांत पटसंख्या कमी झाल्याने तब्बल १७ रात्रशाळा अखेरच्या घटका मोजत असून, काहींना टाळे लागले आहेत. येत्या काळात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असून, त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज रात्रशाळा मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी व मॉडर्न रात्रशाळेचे मुख्याध्यापक निरंजन गिरी यांनी व्यक्त केली.
--
साडेतीनऐवजी अडीच तास शिकवणी
रात्रशाळांमध्ये दुबार शिक्षकांची संख्या ही ७७ हून अधिक आहे. दुबार शिक्षक नेमल्यानंतर पटसंख्या वाढण्याऐवजी उलट
कमी झाल्याचे रात्रशाळा मुख्याध्यापक संघटनेचे म्हणणे आहे. दुसरीकडे सरकारने चुकीचे निर्णय घेऊन यापूर्वी रात्रशाळांसाठी असलेल्या साडेतीन तासांच्या शिकवणीचा वेळ केवळ अडीच तासांवर आणल्यानेही गुणवत्ता ढासळल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
---
कष्टकरी कामगार आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा हा सर्वात मोठा आधार होता. मागील काही वर्षांत मराठी माणूस मुंबईबाहेर स्थलांतरित झाल्याने रात्रशाळा संकटात सापडल्या आहेत. दिवसभर रोजगार, नोकरी करून संध्याकाळी रात्रशाळेत येऊन शिक्षण घेणे असंख्य कामगारांना कठीण झाल्याने अनेकांनी रात्रशाळेकडे पाठ फिरवली.
- निरंजन गिरी, मॉडर्न रात्रशाळेचे मुख्याध्यापक
-----
रात्रशाळांसाठी आवश्यक असलेल्या सुधारणा आणि कमतरता दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन घेण्यात येईल. आवश्यक त्या धोरणाला अनुसरून सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले जाईल.
- संजय जावीर, शिक्षण निरीक्षक, पश्चिम विभाग
-----
फोटो
रात्रशाळा - MUM25F02485
निरंजन गिरी - MUM25-F02460
संजय जावीर - MUM25F02485

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com