डबेवाल्यांच्या आंतरराष्ट्रीय 
केंद्राचे आज उद्‌घाटन

डबेवाल्यांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे आज उद्‌घाटन

Published on

डबेवाल्यांच्या आंतरराष्ट्रीय
केंद्राचे आज उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईच्या डबेवाल्यांना १२५ वर्षांची परंपरा असून, मॅनेजमेंट गुरू म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. १८९०च्या दशकात सुरू झालेली ही सेवा डबेवाल्यांनी आजही सुरू ठेवली आहे. त्यामुळे डबेवाल्यांची कारकीर्द सामान्यांना अनुभवता यावी म्हणून वांद्रे पश्चिम येथे भव्य मुंबई डबेवाला आंतराष्ट्रीय अनुभव केंद्र (एक्सपिरियन्स सेंटर) साकारण्यात आले आहे. त्याचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन केले जाणार आहे. दुपारी दोन वाजता हा सोहळा पार पडणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com