महाराष्ट्र- सिंगापूरमध्ये सहकार्याला नवा आयाम!

महाराष्ट्र- सिंगापूरमध्ये सहकार्याला नवा आयाम!

Published on

महाराष्ट्र-सिंगापूरमध्ये सहकार्याला नवा आयाम!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

उरण, ता. १३ (वार्ताहर) ः भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढते सहकार्य आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंध अधिक दृढ होत असून, यामुळे विशेषतः महाराष्ट्र आणि सिंगापूरमधील संबंधांना नवीन आयाम मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच वाढवण बंदर विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने जेएनपीए बिझनेस सेंटर, उरण येथे ग्रीन अँड डिजिटल या विषयावर मेरिटाइम कॉरिडॉर्स लिडर्स आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सिंगापूरचे उपपंतप्रधान ग्यान किम येंग, सिंगापूर परिवहनमंत्री जेफरी सियो, जेएनपीएचे चेअरमन उन्मेष वाघ, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी. के. रामचंद्रन उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जेएनपीए येथील नवीन पीएसए टर्मिनलचे लवकरच उद्‍घाटन होणार असून, ही अत्याधुनिक सुविधा जेएनपीएच्या ५० टक्के कंटेनर क्षमतेचे नियोजन करेल तसेच भारताच्या जागतिक व्यापाराला चालना देईल. या सुविधेमुळे भारताची सागरी शक्ती अधिक सक्षम होईल.
...
वाढवण प्रकल्प वेळेत पूर्ण होईल!
राज्यातील वाढवण बंदर प्रकल्प हा भारतातील सर्वांत मोठा बंदर प्रकल्प असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल आणि महाराष्ट्र तसेच भारताला सागरी महासत्ता म्हणून स्थापित करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे भारताच्या सागरी पायाभूत सुविधांना नवीन दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. सिंगापूर नेहमीच भारताला सहकार्य करतो. या दोन्ही देशातील भागीदारीचा विस्तार जेएनपीएपासून वाढवण बंदरापर्यंत होण्यासाठी निश्चित सामंजस्य करार होतील, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली.
...
हवामान बदल...
सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग म्हणाले की, हवामान बदल ही जागतिक स्तरावरील एक गंभीर समस्या आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. सिंगापूर आणि भारत एकत्रितपणे ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर विकसित करण्यासाठी सामंजस्य करार तयार करत आहेत. हा करार मजबूत आणि प्रभावी मेरिटाइम क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.
...
३,००० कोटींची गुंतवणूक होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग आणि सिंगापूरचे परिवहनमंत्री जेफरी सिओ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मेपलट्री इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि., सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे ३,००० कोटींची गुंतवणूक होणार असून, मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर औद्योगिक परिसरात रोजगाराच्या ५,००० संधी उपलब्ध होणार आहेत. या कराराअंतर्गत लॉजिस्टिक्स व वेअरहाऊसिंग पार्क, औद्योगिक पार्क आणि डाटा सेंटर्सची निर्मिती करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com