गोविदांची आकाशात झेप
गोविदांची दहीहंडीकडे झेप
विहिरीतील दहीहंडीचा कुर्डुसमध्ये थरार
पोयनाड, ता.१४ (बातमीदार): मराठी सणांमधील दहीहंडी हा एक महत्त्वाचा सण. ग्रामीण भागामध्ये मोठमोठ्या दहीहंडी स्पर्धांमधून हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये लागणारी चुरस विलक्षण असते, पण शांत वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात कुर्डुस येथील विहिरीतील दहीहंडी लोकप्रिय आहे. गावातील तरुणांनी विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची परंपरा ३० वर्षांपासून जोपासली आहे.
कुर्डुस गावातील देऊळ आळीतील पिंगळे, पाटील, शेरमकर, थळे, केणी परिवारातील तरुणांनी १९९२ मध्ये एकत्र येत, वेगळे काहीतरी करण्याच्या विचारातून दहीहंडीची संकल्पना उदयास आली. घरे, मंदिरासमोर दहीहंडी बांधली जाते. हंडी फोडण्यासाठी २ ते ३ थर रचले जातात. कुर्डुस गावातील देऊळ आळीतील हा थरार शनिवार (ता. १६) पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
-------------------------------
तरुणांमध्ये वेगळाच उत्साह
काही वर्षे कुर्डुस गावातील देऊळ आळीतील विहिरीवर तसेच बाजूला असलेल्या सीताफळाच्या झाडाचा आधार घेत दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न झाले. आता बदलत्या काळानुसार कुर्डुस गावातील देऊळ आळी विहिरीच्या मध्यभागी हंडी लावली जाते. हंडी फोडण्यासाठी विहिरीच्या कठड्यावरून थर रचून उडी मारून ही दहीहंडी फोडली जाते. हंडी फोडण्यासाठीचा तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो.
---------------------------
दहीहंडीचे वैशिष्ट्य
विहिरीच्या मध्यभागी बांधली जाणारी दहीहंडी फोडण्यासाठी विहिरीच्या कठड्यावर एकमेकांच्या खांद्यावर थर रचणारे गोविंदा उडी मारून दहीहंडी फोडतात. आजतागयत कोणतीही दुखापत, इजा झाली नसल्याचे विहिरीतील दहीहंडीचे वैशिष्ट्य आहे.
-----------------------------
सरावावर भर
कुर्डुस ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा सोहळा साजरा होता. विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी फोडण्यासाठीचा सराव महत्त्वाचा असतो. जवळपास १५ ते २० दिवसांपासून कुर्डुस गावातील तरुण नोकरी, शिक्षण, व्यवसाय सांभाळून हंडी फोडण्याचा सराव करत असतात.
------------------------------
कुर्डुस गावच्या दहीहंडीला अनोखी पंरपरा आहे. हंडी फोडताना बक्षीस किंवा रोख रकमेपेक्षा दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळतो. यंदा दहीहंडी फोडण्यासाठी गावाबाहेरील इतर गोविंदादेखील सहभागी होणार आहेत.
- अजित पिंगळे, ग्रामस्थ, कुर्डुस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.