एकाच छताखाली बहुउद्देशीय समस्यांवर उपचार

एकाच छताखाली बहुउद्देशीय समस्यांवर उपचार

Published on

लठ्ठपणासाठी क्लिनिक
एकाच छताखाली बहुउद्देशीय समस्यांवर उपचारः २०५० पर्यंत ४५ कोटी लठ्ठपणाने ग्रस्त असण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परळच्या ग्लेनईगल्स रुग्णालयात लठ्ठपणातून मुक्ती या मोहिमेअंतर्गत लठ्ठपणा उपचार केंद्र सुरू केले आहे. या क्लिनिक अंतर्गत लठ्ठपणामुळे येणाऱ्या आरोग्य, सामाजिक आणि भावनिक तणावातून मुक्ती मिळवण्यास मदत केली जाणार आहे. या क्लिनिकमध्ये आहारतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांचा समावेश असून वैद्यकीय उपचारांबरोबरच, आहार आणि मासिक आरोग्याची काळजी घेतली जाईल.
या क्लिनीकच्या माध्यमातून एकाच छताखाली लठ्ठपणास कारणीभूत प्रत्येक घटकांची पाहणी करत त्यानुसार मुळ कारण शोधून उपचार केले जातील. याठिकाणी कार्यरत टीममध्ये डॉ. शंकर झंवर, सहाय्यक संचालक यकृतरोगतज्ज्ञ डॉ. चेतन कलाल, डॉ. स्नेहा कोठारी, डॉ. आरती उल्लाल, रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी संचालक डॉ. प्रशांत राव, मानसशास्त्रज्ञ कविता आदिमूलम आणि वरिष्ठ आहारतज्ज्ञ झमुरुद पटेल यांचा समावेश आहे.

२०५० पर्यंत ४५ कोटी लठ्ठपणाचे शिकार
भारतात लठ्ठपणाचे प्रमाण वेगाने वाढत असून ही एक चिंताजनक बाब ठरत आहे. अलीकडील अभ्यासानुसार, २०५० पर्यंत जवळजवळ ४५ कोटी भारतीय जास्त वजनाचे किंवा लठ्ठ असू शकतात. याचा अर्थ असा की चीननंतर भारतात जास्त वजन आणि लठ्ठपणाने ग्रासलेल्या व्यक्ती वाढत असून भारत जगातील दुसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे .

बैठी जीवनशैली, आहारच्या चुकीच्या सवयी, जंक फुड, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन, हार्मोनल असंतुलन आणि ताणतणाव यामुळे या आजाराला चालना मिळात आहे. लठ्ठपणा ही केवळ शरीरयष्टी बाबत असलेली समस्या नाही. त्यामुळे, एखाद्याला आत्मविश्वास कमी होणे, चिंता, तणाव आणि नैराश्य यासह मानसिक विकारांचा सामना करावा लागू शकतो.

८०टक्के व्यक्तलंची लठ्ठपणाशी झुंज
सध्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. ओपीडीमध्ये दाखल होणाऱ्या १० पैकी ८ व्यक्ती लठ्ठपणाने ग्रासल्या असून त्यांचा शरीर वजन निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स) ३० किंवा त्याहून अधिक आहे. या व्यक्तींना थकवा, अनियमित झोप आणि स्नायू आणि सांधेदुखीच्या तक्रारी सतावतात. अंदाजे ८०टक्के व्यक्ती लठ्ठपणाशी झुंजत आहेत. यापैकी ५० टक्के लोकांना लठ्ठपणामुळे टाइप दोन मधुमेह, स्ट्रोक, हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा अगदी कर्करोगाचा धोका वाढत आहे. म्हणून वेळीच लठ्ठपणाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

उपचारांच्या पलीकडे जाऊन चांगली आरोग्य सेवा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. जागरूकता, प्रतिबंध आणि सक्षमीकरणापासून याची सुरुवात होते. आमच्या नवीन ओबेसिटी क्लिनिकसह, आम्ही लोकांना त्यांचे आरोग्य, त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आत्मविश्वास परत मिळवण्याची संधी देत आहोत. एकाच छताखाली याचे उपचार होतील.
- डॉ. बिपिन चेवले, सीईओ, ग्लेनईगल्स रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com