वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन

वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन

Published on

वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन
ठाणे, ता. १४ : ११६ वर्षांच्या सुवर्ण कारागिरी परंपरेसह प्रसिद्ध असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सने ठाण्यातील आपला ३० वे शोरूम उत्साहात सुरू केले आहे. या खास सोहळ्यास एस. एच. केळकर अँड कंपनी लि.चे चेअरमन रमेश वझे तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, लेखक व निर्माते रवी जाधव, कंपनीचे वरिष्ठ सदस्य आणि मान्यवर ग्राहक विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. वामन हरी पेठे ज्वेलर्सने १९०९ पासून पारंपरिक कारागिरी व आधुनिक डिझाइन्स यांचा सुंदर संगम साधत लोकांच्या मनावर सुवर्णिम ठसा उमटविला आहे. या नव्या शोरूममध्ये ठाणेकरांना सुवर्ण, हिरे व पोलकी दागिन्यांचा आकर्षक आणि उत्कृष्ट संग्रह सादर केला जाणार आहे.

आशीष पेठे यांनी उद्घाटन सोहळ्यात सांगितले, आमचे ३०वे शोरूम सुरू करणे म्हणजे आमच्या ग्राहकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. पूर्वी मुंबईपर्यंत यावे लागत असे, पण आता ठाणेकर ग्राहकांना त्यांच्या घराजवळच आमच्या दर्जेदार सेवांचा लाभ मिळणार आहे. ठाण्याचे उत्साही वातावरण हे गुणवत्ताप्रेमी ग्राहकांसाठी आदर्श असल्याचे म्हटले.

कार्यक्रमाचा समारोप नव्या कलेक्शन्सच्या खास प्रिव्ह्यूने करण्यात आला, ज्यातून वामन हरी पेठे ज्वेलर्सची ‘आठवणींना सोन्याचा साज चढवण्याची’ परंपरा अधिक बळकट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com